Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 24 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोरेगाव पार्क परिसरात तरुणावर हल्ला; गळ्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केला अन्…

कोरेगाव पार्कातील गाडगे वसाहतीत एकाच्या गळ्यावर लोखंडी हत्याराने वार करून वैमनस्यातून तरूणाच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 21, 2026 | 12:30 AM
कोरेगाव पार्क परिसरात तरुणावर हल्ला; गळ्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केला अन्...

कोरेगाव पार्क परिसरात तरुणावर हल्ला; गळ्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केला अन्...

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारीमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज वेगवेगळ्या भागात खून, खुनाचा प्रयत्न, लुटमार यासारख्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होत आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. कोरेगाव पार्कातील गाडगे वसाहतीत एकाच्या गळ्यावर लोखंडी हत्याराने वार करून वैमनस्यातून तरूणाच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे.

 

या प्रकरणी एकावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गौरव बबन राजगुरु (वय २७, रा. संत गाडगे महाराज वसाहत, कोरेगाव पार्क) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ किशोर गायकवाड (वय २३, रा. संत गाडगे महाराज वसाहत, कोरेगाव पार्क) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत गायकवाड यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ हा ‘डिलिव्हरी बाॅय’ म्हणून काम करतो. आरोपीशी त्याचा वाद झाला होता. शनिवारी (१८ एप्रिल) रात्री साडेअकराच्या सुमारास आरोपीने संत गाडगे महाराज वसाहत परिसरात गायकवाडला अडवून शिवीगाळ केली. त्याच्या गळ्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर आरोपी पसार झाला. पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहायक आयुक्त संगीता अल्फान्सो-शिंदे, वरिष्ठ निरीक्षक विजयकुमार डोके यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक संतोष गायकवाड अधिक तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : बांगलादेशनंतर आता पाकिस्तानातही हिंदूवर अत्याचार! २३ वर्षीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या; नेमकं कारण काय?

एका बुक्कीत पत्नीचे नाक केले फ्रॅक्चर

दोघांच्या नावावर असलेल्या फ्लॅटची विक्री करण्याबाबत कोणत्याही कागदपत्रावर सही करण्यास पत्नीने नकार दिल्यानंतर त्याचा राग आल्याने पतीने जोरात ठोसा मारून पत्नीच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका ४५ वर्षाच्या महिलेने कोथरुड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ४७ वर्षीय पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना त्यांच्या राहत्या घरी १५ एप्रिल रोजी सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.

Web Title: A shocking incident of an attack on a youth has taken place in the koregaon park area of pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

पुणे हादरलं! वनराज आंदेकर प्रकरणातील मुख्य साक्षीदाराला संपवण्याचा प्रयत्न; पोलीस चौकीजवळच…
1

पुणे हादरलं! वनराज आंदेकर प्रकरणातील मुख्य साक्षीदाराला संपवण्याचा प्रयत्न; पोलीस चौकीजवळच…

मैत्रीणीच्या घरात डल्ला मारणाऱ्या मित्राला ठोकल्या बेड्या; गुजरातमधील वडोदरातून पोलिसांनी पकडले
2

मैत्रीणीच्या घरात डल्ला मारणाऱ्या मित्राला ठोकल्या बेड्या; गुजरातमधील वडोदरातून पोलिसांनी पकडले

दोन चिमुकल्यांसह विवाहितेची आत्महत्या, धक्कादायक कारणही आलं समोर; चौघांना अटक
3

दोन चिमुकल्यांसह विवाहितेची आत्महत्या, धक्कादायक कारणही आलं समोर; चौघांना अटक

एकाच तरुणाशी ३ सख्ख्या बहिणींचं लग्न; आक्षेपांवर दिला राजा दशरथांचा दाखला
4

एकाच तरुणाशी ३ सख्ख्या बहिणींचं लग्न; आक्षेपांवर दिला राजा दशरथांचा दाखला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.