Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाबळेश्वरमध्ये खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी उघड; वनविभागाने आरोपीला सापळा रचून पकडले

महाबळेश्वरमधील बस स्थानक परिसरात वनविभागाने सापळा रचून मोठी कारवाई केली आहे. वन्यप्राणी खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी करणाऱ्या एकाला रंगेहात पकडले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 20, 2026 | 12:09 PM
महाबळेश्वरमध्ये खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी उघड; वनविभागाने आरोपीला सापळा रचून पकडले

महाबळेश्वरमध्ये खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी उघड; वनविभागाने आरोपीला सापळा रचून पकडले

Follow Us
Follow Us:

मेढा : महाबळेश्वरमधील बस स्थानक परिसरात वनविभागाने सापळा रचून मोठी कारवाई केली आहे. वन्यप्राणी खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी करणाऱ्या एकाला रंगेहात पकडले आहे. या कारवाईत ५.९८०  किलो इतके खवले जप्त करण्यात आले आहे. आरोपीला न्यायालयाने २३ एप्रिलपर्यंत वनकोठडी सुनावली आहे.

महाबळेश्वर वनविभागास मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वनपरिमंडळ अधिकारी सुनिल लांडगे यांनी आपल्या पथकासोबत महाबळेश्वर येथील बसस्थानक परिसरात सापळा रचून, वन्यप्राणी खवले मांजराची शिकार करून त्याचे खवले काढून चिपळूण वरून बसने प्रवास करून महाबळेश्वर या ठिकाणो विक्रीच्या उद्देश्याने आलेला आरोपी प्रसाद तुकाराम गोसावी (रा. मानपाडा डोंबिवली याला मुद्देमालासह पकडले. याप्रकरणी वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अन्वये प्र.गु.रि.क्र. ०४/२०२६ वनपरिमंडळ अधिकारी महाबळेश्वर यांनी गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्ह्यांमध्ये आरोपीकडून खवले मांजराचे ५.९८०  किलो इतके खवले जप्त करण्यात आले आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत खवले मांजर या वन्यप्राण्याचा अनुसूची मध्ये समावेश आहे, व सदर गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला ३ ते ७ वर्षापर्यंत शिक्षा किंवा २५ हजार रुपये इतका दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. सदरचा गुन्हा आरोपीने मान्य व कबूल आहे.

ही कारवाई  प्रदीप रॉधळ, सहा. वनसंरक्षक (वनीकरण) सातारा, दिगंबर जाधव सहा. वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव) सातारा,महादेव मोहिते, वनपरिक्षेत्र अधिकारी महाबळेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली, सुनील लांडगे (वनपरिमंडळ अधिकारी महाबळेश्वर), वनरक्षक बा.भ.मराडे, तुकाराम निकम, वनरक्षक तळदेव, कायम वनमजूर संतोष काळे, रोजंदारी मजूर विशाल जाधव, समीर उतेकर, गणेश वागदरे यांनी केली आहे. पुढील तपास सुनील लांडगे करीत आहेत.

अवैध शिकार करणे किंवा वन्यजीवांच्या अवयवाची तस्करी करणे, अशाप्रकारे कृत्य करून वनकायद्याचे उल्लंघन केल्यास ३ ते ७ वर्षापर्यंत शिक्षा किंवा २५ हजार रुपये इतका दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अशी घटना कोणाच्या निदर्शनास आल्यास त्याबाबतची माहिती वनविभागास कळवून वनविभागाला सहकार्य करावे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी मोहिते यांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा : महिला आरक्षण विधेयक भाजपचे राजकीय षडयंत्र, मतदारसंघाच्या पुनर्रचनेचा पक्षीय अजेंडा; विनायक राऊतांचा आरोप

Web Title: Forest department arrests accused of smuggling scaly cat scales

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 12:09 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Mahabaleshwar News

संबंधित बातम्या

Vidyanand Bapat: ६ गंभीर गुन्हे, पोलिसांचे पुरावे अन्…: पाहा कसा फेटाळला सराईत चव्हाणचा जामीन
1

Vidyanand Bapat: ६ गंभीर गुन्हे, पोलिसांचे पुरावे अन्…: पाहा कसा फेटाळला सराईत चव्हाणचा जामीन

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले
2

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
3

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

Ratnagiri: आरेमध्ये हरवलेल्या मांजरावरून राडा! दोन गटांत तुफान हाणामारी, थेट ब्लेड आणि काठ्यांनी…
4

Ratnagiri: आरेमध्ये हरवलेल्या मांजरावरून राडा! दोन गटांत तुफान हाणामारी, थेट ब्लेड आणि काठ्यांनी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.