Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Accident : भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू; दोन लहान मुले जखमी

लोहगाव परिसरात भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाला. तर दोन लहान मुले आणि महिलेचा पती जखमी झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 07, 2025 | 11:26 AM
भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू; दोन लहान मुले जखमी

भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू; दोन लहान मुले जखमी

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : लोहगाव परिसरात भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाला. तर दोन लहान मुले आणि महिलेचा पती जखमी झाला आहे. रुक्मिणी राजू चव्हाण (वय २९, रा. वडगाव शिंदे रस्ता, लोहगाव ) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. अपघातात चव्हाण यांची दोन लहान मुले जखमी झाले. याबाबत राजू चव्हाण (वय ३३) यांनी विमानतळ पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार, टेम्पोचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, दुचाकीस्वार राजू, त्याची पत्नी रुक्मिणी व मुले लोहगाव भागातून ४ जुलै रोजी रात्री अकराच्या सुमरास निघाले होते. धानोरी जकात नाक्याजवळ भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी रुक्मिणी आणि त्यांची दोन मुले जखमी झाली. रुक्मिणी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जखमी मुलांसह रुक्मिणी यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारांदरम्यान रुक्मिणी यांचा मृत्यू झाला. मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघातानंतर पसार झालेल्या टेम्पो चालकाचा शोध घेतला जात आहे. पोलिस कर्मचारी वाय. एस. चव्हाण तपास करत आहेत.

कारच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू

पाटील इस्टेट भागात भरधाव कारच्या धडकेत पादचारी ज्येष्ठाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघातात मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाची ओळख मात्र पटू शकलेली नाही. ज्येष्ठाचे वय अंदाजे ६५ वर्ष असून, त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. याप्रकरणी खडकी पोलिसांत कार चालकाविरूद्ध गुन्हा नोंद केला आहे. ४ जुलै रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. पोलीस उपनिरीक्षक गाडेकर तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : पोलीस की, खंडणीखोर! कारवाईच्या धाकाने तीनवेळा उकळले पैसे

मगरपट्टा रस्त्यावर दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू

मगरपट्टा रस्त्यावर भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मंगेश पांडुरंग चामनर (वय १७, रा. गवळी वाडा, साईनाथनगर, वडगाव शेरी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत दत्ता सुरनर (वय ३४, रा. वडगाव शेरी) यांनी हडपसर पोलिसांत तक्रार दिली आहे. दुचाकीस्वार मंगेश १ जुलै रोजी मगरपट्टा रस्त्याने सकाळी साडेसातच्या सुमारास निघाला होता. अमनोरा मॉलजवळ भरधाव वाहनाने दुचाकीस्वार मंगेशला धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळी न थांबता पसार झाला. उपचारांपूर्वीच मंगेश यांचा मृत्यू झाला होता.

Web Title: A woman on a two wheeler died after being hit by a speeding tempo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2025 | 11:25 AM

Topics:  

  • Accident News
  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Pune Crime: गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुणे रक्तरंजित! आंदेकर हत्येच्या बदल्यासाठी थेट जावयाच्या मुलालाच…
1

Pune Crime: गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुणे रक्तरंजित! आंदेकर हत्येच्या बदल्यासाठी थेट जावयाच्या मुलालाच…

बायकोनं नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत लॉजवर रंगेहात पकडलं; पती घाबरला अन्…
2

बायकोनं नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत लॉजवर रंगेहात पकडलं; पती घाबरला अन्…

Pune Police : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे पोलिसांचा मोठा बंदोबस्त; आठ हजार कर्मचारी असणार तैनात
3

Pune Police : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे पोलिसांचा मोठा बंदोबस्त; आठ हजार कर्मचारी असणार तैनात

धक्कादायक ! लग्नाचे आमिष दाखवून शिक्षिकेवर सातत्याने अत्याचार; फ्लॅटसाठी पैसेही घेतले अन् नंतर शिक्षिकेलाच…
4

धक्कादायक ! लग्नाचे आमिष दाखवून शिक्षिकेवर सातत्याने अत्याचार; फ्लॅटसाठी पैसेही घेतले अन् नंतर शिक्षिकेलाच…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.