Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बिस्कीट’ पाहून डोळेच गरगरले, कामगाराने मारला डल्ला; 1 कोटी 60 लाख रुपयांचे वीस बिस्कीटे चोरली

कामगारानेचं १ कोटी ६० लाख रुपयांच्या वीस बिस्कीटांवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 25, 2025 | 12:30 AM
‘बिस्कीट’ पाहून डोळेच गरगरले, कामगाराने मारला डल्ला; 1 कोटी 60 लाख रुपयांचे वीस बिस्कीटे चोरली
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : प्रसिद्ध सराफी व्यावसायिकाच्या घराच्या शिफ्टींगसाठी बोलवलेल्या खासगी कामगाराचे साहित्य ने-आण करताना तिजोरीतील सोन्याचे ‘बिस्कीट’ पाहून डोळेच गरगरले. त्याने नजर चुकवून तब्बल १ कोटी ६० लाख रुपयांच्या वीस बिस्कीटांवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी शोध मोहिम राबवत या कामगाराला बेड्या ठोकल्या असून, त्याच्याकडून चोरीचे बिस्कीटे जप्त करण्याची कारवाई सुरू केली आहे. याप्रकरणी गौतम सोळंकी (वय ५२, रा. शुक्रवार पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी नेताजी अरूण जाधव (वय ३३, रा. निगडी) याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

गौतम सोळंकी सराफी व्यावसायिक आहेत. त्यांची मध्यभागात सराफी पेढी आहे. त्यांचे भाऊ व ते व्यवसाय करतात. दरम्यान त्यांनी टिळक रस्त्यावर नवीन फ्लॅट घेतला आहे. यामुळे त्यांचे शुक्रवारी पेठेतून नवीन फ्लॅटवर घराचे शिफ्टींग सुरू होते. साहित्य ने-आण करण्यासाठी नेताजी जाधव याला कामासाठी बोलवले होते. सोळंकी यांची वडिलोपार्जित तिजोरी आहे. तिजोरीत त्यांच्या लहान भावाने सोन्याचे बिस्कीट ठेवले होते. याबाबत त्यांना कल्पना नव्हती. साहित्याची ने आण करताना तिजोरी लिफ्टमध्ये जात नसल्याने त्याचा दरवाजा काढण्यात आला होता. तेव्हा छोट्या कप्यात बिस्कीट असल्याचे नेताजी याला दिसले. त्याने तक्रारदारांच्या कुटूंबियाची नजर चुकवून १ कोटी ६० लाख रुपयांचे सोन्याचे बिस्कीट चोरून पोबारा केला.

दरम्यान, नवीन घरातील शिफ्टींगमुळे नातेवाईक आलेले होते. हा प्रकार लक्षात आला. परंतु, पोलिसांकडे तक्रार कशी करणार असा प्रश्न सोळंखी यांच्यासमोर होता. नातेवाईकांना आपणच कार्यक्रमासाठी बोलावले आणि आपणच तक्रार केल्यास पोलीस सर्वांची चौकशी करतील, यामुळे त्यांनी तक्रार दिली नव्हती. त्याचवेळी चोरीचे बिस्कीट विक्रीसाठी नेताजी जाधव हा प्रयत्नात होता. तो काही सराफी दुकानात गेला होता. तेव्हा सराफी व्यावसायिकांनी सोळंकी यांना याची माहिती दिली. नंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी एक दिवसात शोध घेऊन जाधव याला बेड्या ठोकल्या. पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे हे करत आहेत.

Web Title: A worker has been accused of stealing twenty biscuits worth rs 1 crore 60 lakh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2025 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested
  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Crime News: रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई! दरोड्याचा कट उधळला; पळून आलेल्या मुलाची सुटका
1

Crime News: रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई! दरोड्याचा कट उधळला; पळून आलेल्या मुलाची सुटका

Pune Crime: पुण्यात काळीज पिळवटून टाकणारी घटना! नर्सिंग विद्यार्थिनीची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये गंभीर आरोप
2

Pune Crime: पुण्यात काळीज पिळवटून टाकणारी घटना! नर्सिंग विद्यार्थिनीची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये गंभीर आरोप

Pune Crime: कॅम्प परिसरात किरकोळ वाद जीवावर; सहा जणांनी तरुणावर वार करून केली हत्या
3

Pune Crime: कॅम्प परिसरात किरकोळ वाद जीवावर; सहा जणांनी तरुणावर वार करून केली हत्या

टायर फुटून बसला लागली आग; हॉटेलसमोर थांबलेली बस जळून खाक
4

टायर फुटून बसला लागली आग; हॉटेलसमोर थांबलेली बस जळून खाक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.