Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माळेगावात तरुणावर कोयत्याने सपासप वार; हल्ल्याचं कारणही आलं समोर

माळेगाव येथील राहणाऱ्या चार तरुणांनी जुन्या भांडणाच्या रागातून युवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना गुरुवारी घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 07, 2024 | 12:18 PM
माळेगावात तरुणावर कोयत्याने सपासप वार; हल्ल्याचं कारणही आलं समोर

माळेगावात तरुणावर कोयत्याने सपासप वार; हल्ल्याचं कारणही आलं समोर

Follow Us
Close
Follow Us:

बारामती : माळेगाव येथील राहणाऱ्या चार तरुणांनी जुन्या भांडणाच्या रागातून युवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना गुरुवारी घडली आहे. हल्ला झालेला तरुण गंभीर जखमी झाला असून, माळेगाव पोलिसांनी काही तासातच आरोपींना ताब्यात घेतले आहे. प्रकाश दिगंबर भापकर असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी जखमी भापकर यांनी 4 जणांविरोधात माळेगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, आदी कलमान्वये आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

माळेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चेतन बाळू जाधव यांच्या वडीलाबरोबर भांडण करून त्यांना शिवीगाळ व मारहाण केली, हा जुना राग मनात धरून इतर तिघांच्या मदतीने तावरे कॉम्प्लेक्स, शिवनगर, माळेगाव येथील भिंताडे फायनान्स येथे प्रकाश भापकर हे काम करीत असलेल्या ठिकाणी जात भापकर यांच्यावर त्याचवेळी आरोपी चेतन बाळु जाधव, मयुर रणजित जाधव, विजय बाळासो कुचेकर (तिघे रा. माळेगाव बु ता. बारामती), दिनेश आडके (रा. शिरवली ता. बारामती) यांनी आफिसमध्ये प्रवेश केला व भापकर यांच्यावर अचानकपणे कोयत्याने सपासपा वार केले.

हे सुद्धा वाचा : पुण्यात चाललंय काय? व्हाट्सअ‍ॅपवर डीपी ठेवल्याने तरुणावर कोयत्याने सपासप वार

पोलिसांच्या पथकाची कामगिरी

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, माळेगावचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर, देविदास साळवे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शरद तावरे, पोलीस अंमलदार अमर थोरात, पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर सानप, नंदकुमार गव्हाणे, राहुल पांढरे विजय वाघमोडे, अमोल राऊत, ज्ञानेश्वर मोरे, जालिंदर बंडगर, विकास राखुंडे व होमगार्ड सागर कोळेकर विक्रम मदने यांच्या पथकाने केलेली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर हे करीत आहेत.

राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले

राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये जुन्या भांडणाच्या कारणातून 26 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. ही घटना सोमवारी (दि.2) सायंकाळी हसूल परिसरातील कारागृहाच्या बाजूच्या मैदानावर घडली. दिनेश उर्फ बबलू परमानंद मोरे (वय 26, रा. चेतनानगर, हसूल) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी अनिकेत गायकवाड व गणेश सोनवणे यांची नावे समोर आली असून, शोधासाठी चार पथके रवाना झाली. या हत्येप्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: A young man has been attacked by a coyote in malegaon holding the grudge of an old quarrel nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2024 | 12:18 PM

Topics:  

  • ajit pawar
  • crime news
  • devendra fadanvis
  • Malegaon Crime

संबंधित बातम्या

मोठी बातमी! पार्थ पवारांच्या ‘त्या’ प्रकरणात अंजली दमानिया करणार ‘मोठा गौप्यस्फोट’
1

मोठी बातमी! पार्थ पवारांच्या ‘त्या’ प्रकरणात अंजली दमानिया करणार ‘मोठा गौप्यस्फोट’

Local Body Election: माळेगाव नगरपंचायत निवडणुकीत ट्विस्ट; अजित पवारांना मिळणार ‘या’ व्यक्तीची साथ
2

Local Body Election: माळेगाव नगरपंचायत निवडणुकीत ट्विस्ट; अजित पवारांना मिळणार ‘या’ व्यक्तीची साथ

माझ्या बायकोकडे का बघतोस? आता तुझा…; पुण्यात एकावर धारदार शस्‍त्राने सपासप वार
3

माझ्या बायकोकडे का बघतोस? आता तुझा…; पुण्यात एकावर धारदार शस्‍त्राने सपासप वार

Maharashtra Politics: नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर झाली अन्…; राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये एकच खळबळ
4

Maharashtra Politics: नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर झाली अन्…; राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये एकच खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.