आसामच्या तरुणीची पुण्यात कुंटणखान्यात 5 लाखांत विक्री; पोलीस कर्मचाऱ्याने केला अत्याचार
पुणे : आसाम राज्यातील एका तरुणीला विवाहाच्या आमिषाने पुण्यात आणून तिची बुधवार पेठेतील कुंटणखान्यात पाच लाख रुपयात विक्री करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायकदायक म्हणजे, फरासखाना पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील कर्मचाऱ्याने शारीरिक संबंध प्रस्थापित केले आहेत. विषय म्हणजे, नागरिकांनी आंदोलन केल्यानंतर याप्रकरणी पोलीस कारवाई झाली आहे. याप्रकरणी २५ वर्षीय पीडित तरुणीने फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार शफीऊल आबुल नसूर वाहीद आलम (रा. आसाम), पापा शेख, अधुरा शिवा कामली (दोघे रा. बुधवार पेठ), तसेच एका अनोळखी पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी शफीऊल मूळचा आसाममधील आहे. त्याने जानेवारी महिन्यात विवाहाचे आमिष दाखवून पीडित तरुणीला आसाममधून पळवून आणले. त्याने बुधवार पेठेतील कुंटणखान्यात ५ लाख रुपयात तरुणीची विक्री केली. तरुणीला धमकावून दलाल पापा शेख, अधुरा कामली यांनी तिला वेश्याव्यवसायास प्रवृत्त केले. आरोपींच्या ओळखीतील एका पोलीस कर्मचाऱ्याने तरुणीवर अत्याचार केले. गेले चार महिने हा प्रकार सुरू होता. पीडित तरुणीने त्यांच्या तावडीतून सुटका करुन घेतली आणि पोलिसांकडे तक्रार दिली. आरोपींविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायद्यान्वये (पीटा) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अजित जाधव तपास करत आहेत.
अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार
गेल्या काही दिवसाखाली दुकानात निघालेल्या साडेअकरा वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. बलात्काराची घटना उत्तमनगर येथील एका लॉजवर घडली आहे. याप्रकरणी अपहरण करणाऱ्या दोघांसह लॉजच्या मालकासह व्यवस्थावकावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी राहुल विनोदकुमार गौतम (वय २४, रा. अमरभारत सोसायटी, वारजे), अविनाश अशोक डोमपल्ले (वय २४, रा. वारजे), पिकॉक लॉजचा मालक भगवान दत्ता मोरे, तसेच लॉज व्यवस्थपक टिकाराम चपाघई याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.