Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आईला मारहाण केल्याने मुलाने वडिलांना दगडाने ठेचले; बुलडाण्याच्या चिखलीतील घटना

दारू पिऊन पत्नीस मारहाण करायचा. शुक्रवारी (दि. 21) दुपारी दारू पिऊन आल्यानंतर पत्नी छायाला मारहाण करू लागला. आईला होत असलेली मारहाण सहन न झाल्याने मुलास राग अनावर झाला. त्याने डोक्यात दगड घालून वडिलांना ठार केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 23, 2025 | 01:20 PM
आईला मारहाण केल्याने मुलाने वडिलांना दगडाने ठेचले; बुलडाण्याच्या चिखलीतील घटना

आईला मारहाण केल्याने मुलाने वडिलांना दगडाने ठेचले; बुलडाण्याच्या चिखलीतील घटना

Follow Us
Follow Us:

बुलडाणा : दारूच्या नशेत आईला मारहाण करत असल्याच्या रागातून अल्पवयीन मुलाने दारूड्या बापाची दगडाने ठेचून हत्या केली. चिखली तालुक्यातील धोत्रा नाईक येथे शुक्रवारी (दि. 21) दुपारी 3 वाजताच्या सुमारास घटना घडली. या प्रकरणी अमडापूर पोलिसांनी मुलास ताब्यात घेतले आहे.

सुरेश रमेश भांडवले (वय 43) असे मृत बापाचे नाव आहे. धोत्रा नंदई येथील सुरेश भांडवले हा व्यसनी होता. दारू पिऊन पत्नीस मारहाण करायचा. शुक्रवारी (दि. 21) दुपारी दारू पिऊन आल्यानंतर पत्नी छायाला मारहाण करू लागला. आईला होत असलेली मारहाण सहन न झाल्याने मुलास राग अनावर झाला. त्याने डोक्यात दगड घालून वडिलांना ठार केले. अमडापूर पोलिसांनी आरोपी मुलास ताब्यात घेतले आहे.

मुलगा सैलानी यात्रेनिमित्त पिंपळगाव सैलानी येथे कामाला गेला होता. दोन दिवसांपासून वडील आईला मारहाण करत असल्याची माहिती मिळताच तो घरी परतला. त्याने वडिलांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वडील ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी पुन्हा पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. हे पाहून मुलाचे माथे फिरले आणि त्याने बापास दगडाने ठेचून संपविले. शवविच्छेदनानंतर रात्री 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुण्यातही हत्येचे प्रकरण

दुसऱ्या एका घटनेत, ज्योती शिवदास गिते (वय 28, रा. तुळजाभवानीनगर, खराड) असं खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर शिवदास तुकाराम गिते (वय 37) असे नराधम पतीचे नाव आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. शिवदास गिते याने कात्रीने वार करत पत्नीचा गळा चिरला. यातील धक्कादायक बाब म्हणजे ज्यावेळी आरोपी शिवदासने पत्नीवर कात्रीने वार केला, तेव्हा त्याचा लहान मुलगा खुर्चीवर समोरच बसला होता. हत्या केल्यानंतर आरोपीनं तिचा व्हिडिओ देखील काढला होता.

Web Title: A youth murder his father due to minor issue nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2025 | 01:20 PM

Topics:  

  • Buldana News
  • Murder Case

संबंधित बातम्या

पुण्यातून अपहरण करुन सांगलीत एकाचा खून; धक्कादायक कारणही आलं समोर
1

पुण्यातून अपहरण करुन सांगलीत एकाचा खून; धक्कादायक कारणही आलं समोर

क्षुल्लक भांडणाचा भयंकर शेवट; पत्नीचा मृत्यू, आईला फोन लावला अन् घाबरलेल्या पतीनेही उचलले टोकाचे पाऊल
2

क्षुल्लक भांडणाचा भयंकर शेवट; पत्नीचा मृत्यू, आईला फोन लावला अन् घाबरलेल्या पतीनेही उचलले टोकाचे पाऊल

नागपुरात हत्येचा थरार; पूर्ववैमनस्यातून तरुणाची धारदार शस्त्राने सपासप वार करून हत्या
3

नागपुरात हत्येचा थरार; पूर्ववैमनस्यातून तरुणाची धारदार शस्त्राने सपासप वार करून हत्या

घरातील भांडण विकोपाला! चपात्या बनवण्याच्या तव्याने पतीवर केले सपासप वार, जमिनीवर तडफडत पतीचा मृत्यू
4

घरातील भांडण विकोपाला! चपात्या बनवण्याच्या तव्याने पतीवर केले सपासप वार, जमिनीवर तडफडत पतीचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.