
लव्ह मॅरेज अन् पगारावरून वाद! पतीने गळा आवळून केली बायकोची हत्या; ३ दिवस मृतदेहासोबत घरातच राहिला नराधम
पोलिसांनी आरेपी पतीला केली अटक
बंगळूरमधील संपिगेहळ्ळीजवळ MS नगरनगरच्या अग्रहारा लेआउटमधील एका प्लॉटच्या मालकाने साफसफाईचे काम सुरू केले होते. यावेळी मालकाना महिलेचा मृतदेह दृष्टीस पडला. मालकाने ही घटना पोलिसांना कळवली आणि मग प्रकरणाच्या तपासाला सुरुवात झाली. पोलिसांच्या तपासात हे उघड झाले की, महिलेला ठार मारणार दुसरा-तिसरा कुणी नसून तिचा स्वत:चा पती या हत्येचा मुख्य सुत्रधार आहे. दरम्यान पोलिसांनी त्याला आपल्या ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सागर चंद आणि पत्नी अनुसूया यांनी २ वर्षांआधी कुटुंबाच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला होता. कामाच्या शोधात ते बंगळुरुला आले होते. माहितीनुसार, दोघांमध्ये पैशांवरुन वाद झाला होता. सागर एका हाॅटेलमध्ये सुपरवायझर म्हणून काम करत होता. मागील काही दिवसांपासून अनुसूया पतीच्या हाॅटेलमध्ये जाऊन त्याच्या सॅलरीची चाैकशी करत होती. ११ ऑगस्ट रोजी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि यातच सागरने अनुसूयाचा गळा दाबत तिची हत्या केली.
म्हसवडजवळ भीषण तिहेरी कार अपघात; एकाचा मृत्यू तर नऊजण जखमी
पोलिसांच्या माहितीनुसार, हत्येनंतर आरोपी तीन दिवस मृतदेहासोबत खोलितच राहत होता. तीन दिवसांनंतर, त्याने मृतदेह एका चादरीत गुंडाळून एका मोकळ्या भूखंडात फेकून दिला. तब्बल २० दिवसांनंतर अनुसूयाच्या मृतदेहाचा शोध लागला. इतक्या दिवसांत कुत्र्यांनी लचके तोडून त्याला इकडेतिकडे ओढले होते. पोलिसांनी स्वत: अनुसूयाच्या मृतदेहाचे अंतिम संस्कार केले. तिच्या अंगावर सापडलेल्या माॅलच्या टॅगवरुन आरोपी पतीचा शोध घेण्यात आला. पोलिस चाैकशीत आरोपीने आपला गुन्हा कबूल केले असून लवकर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.