Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिलाच ठरली हत्येचे कारण; मित्राने केली मित्राची हत्या, डोक्यावर दगड मारला अन् छातीवर…

महिलेची दोघांसोबतही जवळीक होती. महिलेला अनुरागपासून एक 3 वर्षांचा मुलगा आहे. मात्र, त्याला नाव अण्णाने दिले होते. अनुरागला अण्णाची महिलेसोबतची जवळीक आवडत नव्हती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 10, 2025 | 07:48 AM
मित्राने केली मित्राची हत्या

मित्राने केली मित्राची हत्या

Follow Us
Follow Us:

नागपूर : नागपुरात दोघे कचरा वेचून उदरनिर्वाह चालवायचे आणि फुटपाथवर रात्र काढायचे. त्यांच्यासोबत एक महिलाही होती. त्या महिलेवर दोघेही हक्क सांगायचे. यातूनच वाद विकोपाला गेला. ती केवळ माझी आहे, असे म्हणत एका मित्राने दुसऱ्याची दगडाने ठेचून हत्या केली. ही थरारक घटना रविवारी रात्री तहसील ठाण्यांतर्गत घडली.

अण्णा ऊर्फ शैलेष हिरालाल सडाक (वय 40) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शुभांगी देशमुख यांच्या नेतृत्वातील पथकाने केवळ तीन तासांत या गुन्ह्याचा छडा लावला आणि आरोपीला अटक केली. अनुराग ऊर्फ घोडा सुनील बोरकर (वय 33) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. अण्णा हा मूळचा सिहोर (मध्यप्रदेश) येथील रहिवासी आहे. सात वर्षांपासून नागपुरात फुटपाथवर राहतो. आरोपी अनुराग हा मूळचा शांतीनगरचा रहिवासी आहे. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने कुटुंबीयांनी त्याला घराबाहेर काढले आहे.

हेदेखील वाचा : Sangli Crime : 7 लाखांची लाच घेताना महापालिका उपायुक्त ACB च्या जाळ्यात; १० लाखांची केली होती मागणी

अनेक वर्षांपासून तो फुटपाथवर राहतो. दोघेही एका निराधार महिलेच्या संपर्कात आले. ती महिलाही त्यांच्यासोबतच राहू लागली. महिलेची दोघांसोबतही जवळीक होती. महिलेला अनुरागपासून एक 3 वर्षांचा मुलगा आहे. मात्र, त्याला नाव अण्णाने दिले होते. अनुरागला अण्णाची महिलेसोबतची जवळीक आवडत नव्हती. मात्र, वारंवार इशारा देऊनही अण्णा तिच्याशी जवळीक साधायचा. घटनेच्या दिवशी म्हणजे रविवारी रात्री तिघेही एकत्र होते.

रागाच्या भरात भलामोठा दगड डोक्यावर मारला अन्…

अण्णा महिलेशी जवळीक साधाण्याचा प्रयत्न करत होता. हे पाहून आरोपी संतापला आणि रागाच्या भरात मोठा दगड अण्णाच्या डोक्यावर मारला. अण्णा रक्तबंबाळ होऊन खाली कोसळला. त्यानंतर अनुरागने त्याच्या छातीवरही दगड मारला. त्यानंतर अनुराग आणि महिला पळून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. अण्णाला उपचारार्थ मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

हेदेखील वाचा : Vasai Crime : १५० कोटींहून अधिक माती भराव प्रकरण, २८ आरएमसी प्लांटवर गुन्हे दाखल, महसुल विभागाची कारवाई

Web Title: A youth murder his friend incident in nagpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2025 | 07:48 AM

Topics:  

  • Murder Case
  • Nagpur Crime News
  • Youth Murder

संबंधित बातम्या

आधी बिर्याणी खाल्ली आणि मग १७ वर्षीय प्रेयसीची केली हत्या, १२ वेळा चाकूने वार अन्… प्रश्नपत्रिकेच्या मदतीने प्रियकराला अटक
1

आधी बिर्याणी खाल्ली आणि मग १७ वर्षीय प्रेयसीची केली हत्या, १२ वेळा चाकूने वार अन्… प्रश्नपत्रिकेच्या मदतीने प्रियकराला अटक

Mumbai Crime : मुंबईत सिया-केतन हत्याकांडाची पुनरावृत्ती! डिलिव्हरी बाॅयने अल्पवयीन प्रेयसीला कड्यावरुन ढकलले
2

Mumbai Crime : मुंबईत सिया-केतन हत्याकांडाची पुनरावृत्ती! डिलिव्हरी बाॅयने अल्पवयीन प्रेयसीला कड्यावरुन ढकलले

Crime News: सांगली हादरली! पैशांच्या हव्यासापोटी ८३ वर्षांच्या वृद्ध आजीला लुटून जिवंत पेटवले; कुटुंबातला नातेवाईक निघाला ‘कसाई’
3

Crime News: सांगली हादरली! पैशांच्या हव्यासापोटी ८३ वर्षांच्या वृद्ध आजीला लुटून जिवंत पेटवले; कुटुंबातला नातेवाईक निघाला ‘कसाई’

प्रेमाचे भयावह रूप! प्रेयसीची हत्या करून मृतदेहाचे केले तीन तुकडे, आरोपी एन्काऊंटरनंतर अटकेत
4

प्रेमाचे भयावह रूप! प्रेयसीची हत्या करून मृतदेहाचे केले तीन तुकडे, आरोपी एन्काऊंटरनंतर अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.