Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेमसंबंधाच्या कारणावरून तरुणावर हल्ला; नग्न करून लोखंडी रॉडने मारहाण

अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून मुलीच्या नातेवाईकांनी तरुणास नग्न करून लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 26, 2025 | 11:07 AM
प्रेमसंबंधाच्या कारणावरून तरुणावर हल्ला; नग्न करून लोखंडी रॉडने मारहाण

प्रेमसंबंधाच्या कारणावरून तरुणावर हल्ला; नग्न करून लोखंडी रॉडने मारहाण

Follow Us
Follow Us:

कोल्हापूर : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशाचं आता कोल्हापूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून मुलीच्या नातेवाईकांनी तरुणास नग्न करून लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. सौरभ भरमा कांबळे (वय २४, रा. निढोरी, ता. कागल) असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. तर अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरुन कांबळे याच्याविरुद्ध मुरगूड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

कुरणी (ता. कागल) येथील एका अल्पवयीन मुलीशी निढोरी येथील सौरभ भरमा कांबळे (वय २४) याचे प्रेमसंबंध असल्याचे मुलीच्या नातेवाईकांना समजले. तेव्हा नातेवाईक व समर्थकांनी गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास सौरभला कारमध्ये जबरदस्तीने बसविले. त्याला कुरणी कालव्याजवळील एका शेडमध्ये नेऊन त्याला नग्न करून बेदम मारहाण केली. मारहाणीत सौरभ कांबळे गंभीर जखमी झाला असून, त्याला कोल्हापूरच्या खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी प्रशांत नामदेव करडे (रा. मुरगूड), शिवप्रसाद शहाजी पाटील व शुभम जीवन पाटील (रा. कुरणी) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत जखमी सौरभचा भाऊ विजय कांबळे याने मुरगूड पोलिसांत फिर्याद दिली.

तर कुरणी येथील संबधित अल्पवयीन मुलीने मुरगूड पोलिसांत फिर्याद दिली आहे. सौरभ कांबळे याने आपल्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध ठेवले असून, याविषयी वाच्यता न करण्यासंबंधी धमकावल्याचे तिने फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार सौरभ कांबळे याच्याविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: A youth was beaten up over a love affair in kolhapur district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2025 | 11:07 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Crime Police
  • In Kolhapur

संबंधित बातम्या

टिळक चौकाजवळ तरुणाला गाठले, मारहाण केली अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ
1

टिळक चौकाजवळ तरुणाला गाठले, मारहाण केली अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ

बनावट चावीने कार उघडली, ५० लाख लुटले; पोलिसांनी ८ तासांत चोरांना पकडले
2

बनावट चावीने कार उघडली, ५० लाख लुटले; पोलिसांनी ८ तासांत चोरांना पकडले

सीसीटीव्ही फुटेजने चोरांचा माग काढला! भद्रावती पोलिसांनी नागपुरातून दोघांना पकडले
3

सीसीटीव्ही फुटेजने चोरांचा माग काढला! भद्रावती पोलिसांनी नागपुरातून दोघांना पकडले

कोल्हापुरात खळबळ! गोड बोलून कड्यावर नेलं, काही तासांत रचला बेपत्ता होण्याचा बनाव; चौकशीत प्रियकराचं भयंकर सत्य उघड
4

कोल्हापुरात खळबळ! गोड बोलून कड्यावर नेलं, काही तासांत रचला बेपत्ता होण्याचा बनाव; चौकशीत प्रियकराचं भयंकर सत्य उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.