Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रुग्णालयात सापडलेला ‘तो’ बॉम्ब नव्हताच! पुणे पोलिसांची घाई; एटीएसलाही कळविले नाही

हडपसरमधील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात आढळलेला तो बॉम्ब नव्हताच, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. फक्त भिती दाखविण्यासाठी युट्यूबद्वारे बॉम्ब सदृश्य वस्तू बनवून ती ठेवण्यात आली असल्याचेही समोर आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 16, 2026 | 11:03 AM
रुग्णालयात सापडलेला 'तो' बॉम्ब नव्हताच! पुणे पोलिसांची घाई; एटीएसलाही कळविले नाही

रुग्णालयात सापडलेला 'तो' बॉम्ब नव्हताच! पुणे पोलिसांची घाई; एटीएसलाही कळविले नाही

Follow Us
Follow Us:

पुणे : हडपसरमधील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात आढळलेला तो बॉम्ब नव्हताच, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. फक्त भिती दाखविण्यासाठी युट्यूबद्वारे बॉम्ब सदृश्य वस्तू बनवून ती ठेवण्यात आली असल्याचेही समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे, याप्रकरणात पुणे पोलिसांनी अती घाई करून दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) न कळवताच तो बॉम्ब म्हणून निकामी केल्याचे समोर आले आहे. पीव्हीसी पाईप, तसेच चिकटटेप आणि ऑनलाईन मागवलेल्या घड्याळपासून बनवली गेलेली बॉम्ब सदृश्य वस्तू होती. याप्रकरणात अटक केलेल्या आरोपीकडे प्राथमिक तपास केल्यानंतर ही बाब स्पष्ट झाली आहे. त्याला नागपूर रेल्वे स्थानकातून पकडले आहे.

 

शिवाजी राम राठोड (वय २९, रा. मांजरी, सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत हॉस्पिटलचे ॲडमीन कॉर्डीनेटर प्रमोद भागवत भालके (वय २८, वारजे) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात दिली आहे.

सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयात बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पुण्यात मोठी खळबळ उडाली होती. पुणे पोलिसांच्या बीडीडीएस पथकाने याठिकाणी धाव घेऊन तपासणी केली. नंतर तो बॉम्ब घेऊन ग्लायडिंग सेंटर भागात नेहून निकामी केला होता. मात्र, आता तो बॉम्ब नसल्याचे वास्तव समोर आले आहे. बीडीडीएस पथकाने घाईत तो नेहून एक्सप्लोझिव वापरून त्याचा स्फोट घडवून आणला आणि तो निकामी केला. दरम्यान, बॉम्ब सदृश्य वस्तू किंवा बॉम्ब असल्यानंतर त्याची माहिती एटीएसला द्यावी लागते. परंतु, पुणे पोलिसांकडून ती कळवली गेली नाही. तर एटीएस तेथे पोहोचण्यापूर्वी तो निकामी देखील केला.

एटीएस विभागाला अशा प्रकरणात विशेष प्रशिक्षण देण्यात आलेले असते. तसेच, त्यांच्याकडे बॉम्बमध्ये खरेच एक्सप्लोझिव आहेत का, हेही पाहण्याची उपकरणे असतात. मात्र, पुणे पोलिसांनी एटीएसला कळवले नाही. त्यामुळे त्यांना ही बाब समजण्यास आणि घटनास्थळी पोहचण्यास उशिर झाला. तोपर्यंत पोलिसांनी बॉम्ब निकामी केला होता, अशी माहिती आता समोर आली आहे. पुणे पोलिसांनी केलेल्या घाईमुळे मात्र, पुण्यात जिवंत बॉम्ब आढळला अशी माहिती सर्वापर्यंत गेली आणि विनाकारण पुन्हा एक दहशतीचे वातावरण पसरले गेले.

आरोपीच्‍या रात्री अकरापर्यंत फेऱ्या

आरोपी शिवाजी राठोडने साधारण पाच ते सहाच्या दरम्यान हॉस्पिटल मध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवली होती. नंतर तो एका सलूनच्या दुकानात गेला आणि दाढी करून आला. दाढीचे दुकान बंद होते. तरीही त्याला बोलवून घेऊन दाढी केली. या घटनेनंतर तो घटनास्थळी आला, यावेळी त्याला पोलिस पोहचल्याचे कळाले. यावेळी ११ वाजेपर्यंत तो आजू बाजूला फिरत होता. नंतर तो घरी गेला.

४०० रुपयांत बनवली बॉम्ब सदृश्य वस्तू

खंडणीचा डाव आखण्यासाठी केवळ ४०० रूपयात बॉम्ब सदृश्य वस्तू बनविल्‍याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्‍याने ऑनलाईन १६० रूपयांचे टिकटिक घड्याळ मागवले. काही रूपयांचे छोटेशे पीव्हीसी पाईप, चिकट टेप, वायर याने तो बनावट बॉम्‍ब बनविला. महत्‍वाची बाब म्‍हणजे. ही बॉम्‍ब सदृश्य वस्‍तू बनविताना त्‍याने चिकट टेप संपल्‍याने तो एका दुकानात जाऊन ऑनलाईन १५ रूपयांचा टेप खरेदी केला. तेथेच पोलिसांना सीसीटिव्‍हीनंतर दुसरा धागा मोबाईल नंबर स्वरूपात सापडला.

मांजरीतल्‍या घरी पथकांची धडक

अटक केलेला आरोपी हा एका कपड्याच्‍या दुकानात कामाला होता. मुळचा तो सोलापूर येथील असून, पुण्यात मांजरीत तो एका छोट्याश्या खोलीत भाडेतत्‍वावर राहतो. पत्नी व तो याठिकाणी राहतात. त्याच्या घराचा पत्‍ता मिळाल्‍यानंतर त्‍यांनी त्‍याचे घर गाठले. त्‍याच्‍याबाबत त्‍याच्‍या पत्‍नीला विचारले असता तो १५ मिनिटांपूर्वी खूप गर्मी आहे. त्यामुळे नातेवाईकांकडे जाऊन येतो, असे सांगून गेल्याचे सांगितले.

हे सुद्धा वाचा : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’वर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

दुकानदाराला ऑनलाईन ३ हजार पाठवून घेतली कॅश

बॉम्‍ब सदृश्य वस्‍तू ठेवल्‍याच्‍या प्रकारानंतर गुरूवारी सायंकाळपर्यंत तो आरोपी हा पुण्यात होता. त्‍याआधी त्‍याने एका दुकानदाराला मोबाईलवरून 3 हजार रूपये पाठवून दुकानदाराकडून तीन हजारांची रोख रक्‍कम घेतली. यादरम्‍यान त्याने कोलकत्यातील हावडा येथील स्‍थानकाचे रेल्‍वे तिकीट काढले होते. तो त्‍याच्‍या नेपाळ येथील बहिणीकडे फिरण्यासाठी जात असताना त्‍याला नागपूर येथे ताब्यात घेण्यात आले.

आजाराने ग्रस्‍त असल्‍याने तो रुग्णालयात गेला. तिथे त्याला उपचारासाठी लाखांच्या घरात खर्च सांगितला. त्यामुळे त्याने रुग्णालयातच बॉम्ब सदृश्य बनवून तिथे ठेवली. त्यांना भिती दाखविण्यासाठी, नंतर रुग्णालयाकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न होता. त्यासाठी त्याने रूग्णालयात बॉम्‍ब सदृश्य वस्‍तू ठेवला असल्याचा दावा पोलिसांनी केला. विशेषत: त्याने हे यूट्यूब पाहून बॉम्ब सदृश्य वस्तू बनविल्‍याची माहिती देण्यात आली. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) त्याला नागपूरमध्ये पकडले. तो नागपूरमार्गे कोलकाता आणि नंतर नेपाळला पळून जाण्याच्‍या तयारीत होता.

Web Title: Accused arrested for planting bomb like object in hospital in hadapsar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 11:01 AM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?
1

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
2

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण
3

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
4

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.