Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: AI चा असाही गैरवापर! तरूणीला थेट फोटो अश्लील पद्धतीने एडिट करण्याची धमकी दिली अन्…

एआयचा गैरवापर करून तरुणीला नाहक छळ करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 23, 2025 | 08:26 PM
Crime News: AI चा असाही गैरवापर! तरूणीला थेट फोटो अश्लील पद्धतीने एडिट करण्याची धमकी दिली अन्…
Follow Us
Close
Follow Us:

कृत्रिम बुद्धिमत्ता आजकाल जगभरात सर्वात आधुनिक तंत्रज्ञान 
अनेक गोष्टींमध्ये केला जातोय एआयचा वापर 
पिंपरीमध्ये एआयच्या मदतीने तरुणीला दिली धमकी

पिंपरी: कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा जगभरात वाढता वापर होत असताना, त्याचा गैरवापर करून गुन्हेगारी प्रकार समोर येत आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये एआयच्या साहाय्याने तरुणीचे अश्लील फोटो एडिट करण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बनावट अकाउंटवरून छेडछाड

पोलीस तपासानुसार, अज्ञात आरोपीने २० वर्षीय तरुणीचे नाव व फोटो वापरून एक बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार केले. त्या अकाउंटवरून वारंवार मेसेज करून तिला त्रास देण्यात येत होता. “तू कोण आहेस?” असा प्रश्न विचारल्यानंतरही आरोपीने उत्तर दिले नाही. उलट पोलिसात तक्रार करणार असल्याचे सांगूनही तरुणीला छेडछाड सुरूच ठेवण्यात आली.
एआयच्या साहाय्याने अश्लील फोटो
काही दिवसांपूर्वी आरोपीने तरुणीचे इन्स्टाग्रामवरील फोटो एआयच्या मदतीने एडिट करून, कपडे बदललेले अश्लील फोटो तिला पाठवले. त्याचबरोबर आणखी अश्लील फोटो तयार करून पाठवण्याची धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता आरोपीने तिच्या मित्रांना इन्स्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्टही पाठवल्याचे समोर आले आहे.
“एआयचा गैरवापर करून तरुणीला नाहक छळ करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे,” अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंके यांनी दिली.

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पळवून नेत संबंध प्रस्थापित केले अन्…

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यातच आता लग्नाचे आमिष दाखवून 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. अतिप्रसंग करणाऱ्या आरोपीस येथील मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. पी. झपाटे यांनी दिलेल्या निकालात आजन्म कारावास व ८५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पळवून नेत संबंध प्रस्थापित केले अन्…

मालेगाव तालुक्यातील एका गावातील २२ वर्षीय तरुण वैभव शालीकराम कन्हाळे याने ८ जून २०१९ रोजी १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून मेहकर तालुक्यातील कन्हाळवाडी येथे पळवून नेले. त्यानंतर त्याने संबंध प्रस्थापित केले. ११ जून २०१९ पर्यंत दोघे कहाळवाडी येथेच होते. त्यानंतर सदर अल्पवयीन मुलगी ११ जून रोजी आपल्या गावी घरी परत आली.

Web Title: Accused threat to young girl obscene editied photo by ai crime pcmc news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2025 | 08:26 PM

Topics:  

  • Artificial intelligence
  • crime news
  • PCMC News

संबंधित बातम्या

कारवाईचा थरार! 5 कोटींच्या खंडणीची मागणी अन्…; कराड पोलिसांनी 5 आरोपींना थेट…
1

कारवाईचा थरार! 5 कोटींच्या खंडणीची मागणी अन्…; कराड पोलिसांनी 5 आरोपींना थेट…

Crime News: ‘डिजिटल अरेस्ट’ करून गृहिणीला २५ लाखांचा गंडा; मुंबई पोलीस आणि ईडी अधिकारी असल्याचा बनाव
2

Crime News: ‘डिजिटल अरेस्ट’ करून गृहिणीला २५ लाखांचा गंडा; मुंबई पोलीस आणि ईडी अधिकारी असल्याचा बनाव

Waluj MIDC Fraud Case: वाळूज एमआयडीसीत मोठी फसवणूक! पाईप सप्लायरला ९१ लाखांचा गंडा; पुण्यातील उद्योजक पती-पत्नीवर गुन्हा दाखल
3

Waluj MIDC Fraud Case: वाळूज एमआयडीसीत मोठी फसवणूक! पाईप सप्लायरला ९१ लाखांचा गंडा; पुण्यातील उद्योजक पती-पत्नीवर गुन्हा दाखल

अडीच हजारांची लाच घेणं भोवलं; आरटीओ अधिकाऱ्यासह दोघांना रंगेहात पकडले
4

अडीच हजारांची लाच घेणं भोवलं; आरटीओ अधिकाऱ्यासह दोघांना रंगेहात पकडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.