
सक्षम ताटेनंतर आणखी एक भयंकर हत्याकांड; भररस्त्यात चाकूने भोसकून तरुणाची हत्या
अकोला : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे गुन्हे घडताना दिसत आहे. त्यातच आता नांदेडमध्ये प्रेमप्रकरणातून सक्षम ताटे या तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच अकोल्यात देखील अशीच घटना घडली आहे. अकोल्यातल्या शेगावमध्ये प्रेम प्रकरणातून भयंकर हत्याकांड घडले. एका तरुणाची भररस्त्यात चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली.
गौरव बायस्कार असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. चार जणांनी रस्त्यात गौरवला गाठून जागीच संपवले. या घटनेमुळे अकोल्यात खळबळ उडाली आहे. अकोला जिल्ह्यातील शेगाव अकोट रस्त्यावर गौरव बायस्कार या तरुणाची हत्या करण्यात आली. प्रेम प्रकरणातून गौरववर चौघांनी जीवघेणा हल्ला केला. भरस्त्यावर त्याच्यावर चाकूने सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गौरवने जागीच प्राण सोडले. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
हेदेखील वाचा : जळकोट ते पुणे… खुनी महिलेचा प्रवास! एका उसनवारीच्या वादातून घडलेल्या क्रूर कृत्याचा पोलिसांनी असा लावला छडा
दरम्यान, लोहारा गावातील मोरे कुटुंबातील एक अल्पवयीन मुलगा, त्याचे वडील आणि इतर दोनजण या चौघांनी एकत्रित गौरवची हत्या केली. अकोला जिल्ह्यातील अकोट-शेगाव रस्त्यावरील अंदुरा फाट्यावर भरदिवसा हे हत्याकांड घडल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणात उरळ पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.
नांदेडमध्ये सक्षम ताटेची निर्घृण हत्या
नांदेडमधील मिलिंद नगर, इटवारा परिसरात सक्षम ताटे (वय 20) या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली. सक्षमचे आंचल मामीडवार या तरुणीशी प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधातून सक्षमची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आंचलचे वडील गजानन मामीडवार, भाऊ हिमेश मामीडवार आणि साहिल मामीडवार यांनी सक्षमच्या डोक्यात फरशी व दगड घालून हत्या केल्याची माहित पोलिसाच्या प्राथमिक तपासातून मिळाली आहे.
अनैतिक संबंधातून चुलत भावाची हत्या
दुसऱ्या एका घटनेत, अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून चुलत भावाचा खून करण्यासाठी सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणात चार जणांना अटक केली आहे. हत्या झालेल्या तरुणाचे नाव अजयकुमार गणेश पंडित (वय 22, साईनगर, खोपडेनगर, कात्रज; मूळ रा. हजारीबाग, झारखंड) असे आहे.
हेदेखील वाचा : Akola Murder: अकोल्यात धक्कादायक घटना! पतीनेच केली पत्नीची निर्घृण हत्या, ‘या’ कारणामुळे घडला थरार…