चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातून एक हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीची तलवारीने निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना शनिवारी (6 डिसेंबर) राजुरा तालुक्यातील हरदोना (बु.) येथे घडली. मृतकाचे नाव राजेश नारायणलाल मेघवंशी असे आहे. पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. आरोपी महिलेचं नाव दुर्गा मेघवंशी (33) तर टोच्या प्रियकराचे नाव चंद्रप्रकाश मेघवंशी (40) असे आहे.
काय घडलं नेमकं?
दहा वर्षांपूर्वी राजेशचं दुर्गा नावाच्या महिलेसोबत लग्न झालं होतं. हे दोघेही मूळचे राजस्थानचे रहिवासी होते. गेल्यावर्षी राजेश आपल्या पत्नीसोबत ब्लास्टिंगच्या कामातून रोजगार मिळवण्यासाठी हरदोना गावात गेला होता. त्यादरम्यान, दृगचे तिथे काम करणाऱ्या चंद्रप्रकाश मेघवंशी नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध सुरू झाले. यानंतर, काही महिन्यांनी राजेश आपल्या पत्नीला घेऊन पुन्हा गावी परतला. त्यांनतर सहा महिन्यापूर्वी, चंद्रप्रकाश याने दुर्गाला राजस्थानमधून पळवून नेले. यासंबंधी राजेशने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.
माझ्या पत्नीला पळवून का नेलं?
त्यानंतर दुर्गा ही तिच्या प्रियकरासोबत राजुरा तालुक्यातील हरदोना येथे असल्याची राजेशला माहिती मिळाली. राजेश हा आपल्या पत्नीचा शोध घेत ५ डिसेंबर रोजी राजेश हरदोना येथे पोहोचला. त्यावेळी, हरदोना येथील अंबुजा सिमेंट कंपनीजवळ मजुरांच्या घरासोबत राजेशने चंद्रप्रकाशला ‘माझ्या पत्नीला पळवून का नेलं?’ असा जाब विचारला. यावेळी दोघांमध्ये मोठा वाद झाला. वाद सुरु असतांना दुर्गाने तिच्या हातात तलवार दिली आणि त्या तलवारीने चंद्रप्रकाशने राजेशच्या डोक्यात वार केला. या हल्ल्यात राजेश गंभीररित्या जखमी झाला आणि तो जमिनीवर कोसळला. हा हल्ला एवढा जोरात होता की त्याचा जागीच मृत्यू झाला.
आरोपी अटकेत
या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेला असून आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणासंबंधी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा केला आहे. पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहे.
Ans: राजुरा तालुक्यातील हरदोना (बु.) येथे.
Ans: पत्नीने तलवार प्रियकराला दिली, प्रियकराने डोक्यात वार केले.
Ans: पत्नीचा शोध घेण्यासाठी.






