
crime (फोटो सौजन्य: social media)
Navi Mumbai Crime : घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक , शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत
उपचारासाठी नेत असताना आग
सविस्तर माहिती अशी की, ऑरेंज हॉस्पिटलची ही अॅम्बुलन्स एका दिवसाच्या नवजात बालकाला प्रसवानंतर पुढील उपचारांसाठी अहमदाबाद येथे घेऊन जात होती, मोडासा शहरातून जात असताना वाहनाच्या मागील बाजूला अचानक आग लागली. काही सेकंदांतच अॅम्बुलन्सच्या मागील बाजुला आगीने वेढले, ज्यामुळे डॉक्टर, नर्स, नवजात बालक आणि त्याच्या वडिलांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही, चालक आणि नातेवाईक मात्र पुढील बाजूने उडी मारून बाहेर पडले.
स्थानिकांची धावपळ
घटनास्थळी उपस्थित नागरिकानी तत्काळ मोडासा नगरपालिका अग्निशमन दलाला माहिती दिली, अग्निशमन दलाने शर्तीच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. स्थानिक पोलिसांनी जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. या दुर्घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आला आहे, ज्यात पेट्रोल पंपाजवळ धगधगत असलेली अॅम्बुलन्स स्पष्ट दिसते.
एकाच कुटुंबातील ७ आरोपींना जन्मठेप
राजस्थानातील बांबळू गावातील भंवरनाथ खुन प्रकरणी न्यायालयाने ७ कुटुंब सदस्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ही घटना २७ मे २०१४ रोजी घडली होती. जामसर येथील रहिवासी अन्ननाथ यांनी सांगितले की, त्यांचा भाऊ भंवरनाथ त्यांच्या काकांच्या घरी जात असताना पिकअप ट्रकमध्ये असलेल्या मोहननाथ, हेमनाथ, धन्नानाथ, शंकरनाथ, बधू, सीता आणि सरोज यांनी त्यांचा मार्ग अडवून हल्ला केला.
या हल्ल्यात भंवरनाथ गंभीर जखमी झाले आणि पीबीएम रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी ऑगस्ट २०१४ मध्ये गुन्हा नोंदवला आणि न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. घटनास्थळावरून जप्त केलेले रक्ताने माखलेले कपडे, काठ्या, नियंत्रण नमुने आणि इतर साहित्य सरकारच्या वकिलांनी महत्त्वाचे पुरावे म्हणून सादर केले. एफएसएल अहवाल आणि वैद्यकीय कागदपत्रांनी मृतभंगाची गंभीरता सिद्ध केली.
Jalgaon Crime: जळगाव रेल्वे रुळ प्रकरणाचा उलगडा; अपघात नव्हे, पूर्वनियोजित खून! एक आरोपी अटकेत