घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक , शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत
गेल्या काही दिवसांपूर्वी सानपाडा परिसरात घरफोडी करून 21 लाख रुपयांचे दागिने चोरी केल्याची घटना घडली होती. याबाबत सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा कक्ष एक ही समांतर तपास करत असताना, गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आरोपी निष्पन्न केले. व त्या दिशेने तपास फिरवला असता विश्वसनीय गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, सानपाडा येथील घरफोडीचे आरोपी हे टिटवाळा येथील बनेली या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा कक्ष एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी भगत यांनी सहाय्यक निरीक्षक बनकर, उपनिरीक्षक काकड, बोरुडे, सहाय्यक उपनिरीक्षक पवार, हवालदार चंद्रकांत कदम, अतिश कदम, साळुंखे, पोलीस नाईक मिर्झा, पोलीस शिपाई सचिन पाटील, सावरकर यांचे एक पथक स्थापन करून, टिटवाळा बनेली या ठिकाणी सापळा लावून आरोपी आरिफ शफिक अन्सारी, वय 34 वर्ष, व इस्तियाक मोबीन अन्सारी, वय 58 वर्ष, या दोघांना अटक करून त्यांच्या जवळून सानपाडा घरकुल येथील चोरीस गेलेल्या शंभर टक्के मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. आरोपी इस्तियाख मोबीन अन्सारी याच्यावर मुंबईतील 3 पोलीस ठाण्यात याआधी देखील गुन्हे दाखल आहेत. तर दुसरा आरोपी आरिफ शफिक अन्सारी याच्यावर मुंबईतील 4 पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
नवी मुंबईत एका ३४ वर्षीय व्यक्तीला त्याच्या चुलत भावाने आणि त्याच्या सहकाऱ्याने मोबाईल चोरीच्या संशयावरून मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, आरोपी अर्जुन अडागळे (५५) याला त्याचा चुलत भाऊ सुधाकर पाटोळे याने त्याचा मोबाईल चोरल्याचा संशय होता. याचा बदला घेण्यासाठी त्याने गुरुवारी सकाळी विधान मंडल नावाच्या व्यक्तीसोबत मिळून त्याची हत्या केली. त्यांनी सुधाकर पाटोळे यांना सार्वजनिक शौचालयात नेले, जिथे त्यांनी दारू पाजली आणि नंतर त्यांना बेदम मारहाण केली, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर दोघेही घटनास्थळावरून पळून गेले.






