नेमकं प्रकरण काय?
हर्षल प्रदीप भावसार (३१) हा जळगावातील दिनकर नगर इथे राहत होता. तो तानाजी मालुसुरे नगरात मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ नोव्हेंबरच्या रात्री हर्षल हा आईला जेवण देऊन बाहेर पडला. जळगावच्या खेडी रॉड परिसरातील ओंकार हॉटेलमध्ये जेवण करत असतांना याचा भूषण संजय महाजन, लोकेशन मुकुंदा महाजन आणि परेश संजय महाजन या तिघांशी वाद झाला. केवळ एका अपमानास्पद शब्दावरून त्या तिघांमध्ये किरकोळ वादावादी झाली. हॉटेलमध्ये सुरु झालेल्या या वादाचे रूपांतर तात्काळ हाणामारीत झाले.
Nilesh Ghaiwal : उच्चशिक्षण घेणारा तरूण गुन्हेगारीकडे वळला; वाचा निलेश घायवळ टोळीचा संपूर्ण इतिहास
अपघात असल्याचे भासवले आणि…
आरोपींनी आधी हॉटेल आणि काशीबाई शाळेच्या मागील रस्त्याबर निर्दयीपणे मारहाण केली. यात हर्षल गंभीर जखमी झाला. यानंतर त्या तिघांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याला दुचाकीवरून उचलून तानाजी मालुसरे नगरातील शेतात नेले. तेथे पुन्हा मारहाण केली. त्यानंतर हा अपघात असल्याचे भासविण्याचा आरोपींनी हर्षलला उचलून जळगाव- भादली तिसया रेल्वे लाईनवर फेकून दिले. धावत्या रेल्वेयखाली आल्याने हर्षलचा अपघाती मृत्यू झाला. असे भासवण्याचा प्रयत्न होता.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तिन्ही आरोपींनी हर्षलला प्रथम हॉटेल आणि काशिबाई शाळेच्या मागील रस्त्यावर निर्दयीपणे मारहाण केली. यात हर्षल गंभीर जखमी झाला. यानंतर त्या तिघांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याला दुचाकीवरून उचलून तानाजी मालुसरे नगरातील शेतात नेले. तेथे पुन्हा मारहाण केली. त्यानंतर हा अपघात असल्याचे भासविण्यासाठी आरोपींनी हर्षलला उचलून जळगाव-भादली तिसऱ्या रेल्वे लाईनवर फेकून दिले. धावत्या रेल्वेखाली आल्याने हर्षलचा अपघाती मृत्यू झाला, असे भासवण्याचा आरोपींचा डाव होता.
आईची शंका आणि…
हर्षलचा मृत्यू अपघात नसून घातपात असल्याची शंका त्याची आई ज्योती प्रदीप भावसार यांना आली. त्यांनी ही शंका व्यक्त केल्यानंतर शनिपेठ पोलिसांनी त्यानुसार कसून तपास सुरु केला आहे. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे शनिपेठ पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपींविरुद्ध खुनाचा (कलम 302) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन आरोपींपैकी एक भूषण संजय महाजन याला अटक करण्यात आली असून पोलीस इतर दोन आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
Ans: हर्षल
Ans: भूषण
Ans: शनिपेठ






