"मी एअर इंडियाचे विमान क्रॅश केलं...", एकतर्फी प्रेम आणि १२ राज्यांमध्ये बॉम्बस्फोटांच्या धमक्या..., नेमकं प्रकरण काय? (फोटो सौजन्य-X)
Air India Plane Crash News In Marathi: १२ जून रोजी अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान टेकऑफ केल्यानंतर अवघ्या ३० सेकंदांनी एअर इंडियाचे विमान कोसळलं. या अपघातात विमानातील २४१ जणांचा मृत्यू झाला. याशिवाय, ज्या वसतिगृहाच्या इमारतीवर विमान कोसळले त्या इमारतीत ३४ जणांचा मृत्यू झाला. अशाप्रकारे या अपघातात एकूण २७५ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर ही घटना नेमकी कशी घडली? यामध्ये कोणाची चूक होती? याचा तपास सुरु आहे. विमानातील ब्लॅक बॉक्सची तपासणीदेखील सुरु आहे, यात कोणता घातपात झाला आहे का? यादृष्टीने तपास सुरु असताना पोलिसांना एक ईमेल येतो, ज्यात म्हटलं मीच प्लेन क्रॅश केलं, असं लिहिलेलं असते. या ईमेल नंतर गुजरात पोलीस अलर्ट मोडवर जातात.
ठुकरा के मेरा प्यार मेरा इंतकाम पाहिलेगी…. कथा काहीशी अशीच आहे, फक्त यावेळी हे शब्द एका मुलीचे होते. प्रेमात दुखावलेली एका तरुणीने बदला घेण्याच्या दृष्टीने दिल्लीसह १२ राज्यांचे पोलीस, गुप्तचर संस्था, शेकडो सुरक्षा कर्मचारी आणि हजारो सामान्य लोकांना एक ईमेल पाठवून धक्काच दिला आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमसह १२ राज्यांमध्ये २१ पेक्षा जास्त वेळा खोट्या बॉम्ब धमक्या दिल्याबद्दल पोलिसांनी चेन्नईतील रेने जोसिल्डा या तरुणीला अटक केली आहे. ती रोबोटिक्समध्ये प्रशिक्षित अभियंता आहे आणि चेन्नईतील एका बहुराष्ट्रीय कंपनीत वरिष्ठ पदावर काम करते. एअर इंडियाचे विमान नुकतेच कोसळल्यानंतर तिने तिच्या ‘प्रियकर’च्या नावाने एक ईमेल पाठवला आणि दावा केला की मीच प्लेन क्रॅश केलं, असं लिहिलेलं असतं.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तरुणीचे तिच्या सहकारी दिविज प्रभाकरशी एकतर्फी प्रेम झाले. परंतु फेब्रुवारीमध्ये प्रभाकरने दुसऱ्या मुलीशी लग्न केले. त्यानंतर रेने जोसिल्डाला या एकतर्फी प्रेमाचा सूड घेण्याचा विचार येतो. यानंतर ती महिला प्रियकराच्या नावाने म्हणजेच प्रभाकरच्या नावाने अनेक ईमेल तयार केले आणि बनावट बॉम्ब माहिती असलेले ईमेल पाठवू लागली. ती तांत्रिकदृष्ट्या खूप कुशल असल्याने पोलिसांपासून वाचण्यासाठी तिने डार्क वेब आणि व्हर्च्युअल आयडीचा चांगला वापर केला. मात्र पोलिसांच्या तपासात तीचा शोध घेऊन तिला अटक करतात.
पोलीस तपासात असे दिसून आले की, रेनेने दिविज प्रभाकरच्या नावाने अनेक बनावट ईमेल आयडी तयार केले होते आणि त्याद्वारे अहमदाबादसह ११ राज्यांमध्ये बॉम्बच्या धमक्या पाठवल्या होत्या. अहमदाबादमध्ये त्याने नरेंद्र मोदी स्टेडियम, जिनेव्हा लिबरल स्कूल आणि एक हॉस्पिटल उडवून देण्याची धमकी दिली होती. व्हीआयपी कार्यक्रम आणि मोठ्या कार्यक्रमांपूर्वी या धमक्या देण्यात आल्या होत्या, ज्यामुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते.
गुजरात पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या धमक्यांमुळे महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू, दिल्ली, कर्नाटक, केरळ, बिहार, तेलंगणा, पंजाब, मध्य प्रदेश आणि हरियाणामध्ये सुरक्षा अलर्ट जारी करावा लागला. प्रत्येक वेळी तपासानंतर पोलिसांना कळायचे की ही फक्त खोटी धमकी होती, परंतु तोपर्यंत सरकारी यंत्रणेला मोठे नुकसान आणि गोंधळाला सामोरे जावे लागले असते.
यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अहमदाबाद विमान अपघातानंतर जेव्हा बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये गोंधळ उडाला होता, तेव्हा रेनेने कॉलेजला एक ईमेल पाठवला की,’एअर इंडियाचे विमान क्रॅश केल्याचे ती म्हणाली. ‘तुम्हाला आमची धमकी विनोद वाटली. आता तुम्हाला कळले की आम्ही किती गंभीर आहोत.’ असे तिने ईमेलमध्ये लिहिले. यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली.
जोशिल्डाचा वेडेपणा इथेच संपला नाही. महिलेने दिल्ली, पंजाब, बिहार, महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, तेलंगणा, मध्य प्रदेश, गुजरात आणि हरियाणा येथील वेगवेगळ्या ईमेल आयडीवरून बनावट बॉम्ब धमक्या पाठवल्या. सर्व ईमेल मे ते जून २०२५ दरम्यान पाठवण्यात आले.
राइनने VPN, Tor ब्राउझर आणि डार्क वेबद्वारे तिची ओळख लपवण्याचा प्रयत्न केला. पण सहा महिन्यांपूर्वी तिने एकाच डिव्हाइसवरून खऱ्या आणि बनावट ईमेल आयडीवर लॉग इन केले. यामुळे तिची खरी ओळख आणि ठिकाण समोर आलं. अहमदाबाद पोलिसांच्या सायबर क्राईम टीमने या सुगावाच्या आधारे तिला अटक केली.