खंडाळा बसस्थानकात अपघात(संग्रहित फोटो)
वाडी : आयुध निर्माणी अंबाझरीच्या सेल मशीन विभागात कार्यरत तिघा कर्मचाऱ्यांच्या दुचाकीला सोमवारी (दि.23) सकाळी भरत नगर वळणावर मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
उत्तमकुमार ठाकूर (वय 42) असे आहे. तर सतीश लाकरा (वय 33) आणि फुलचंद एक्का (वय 33) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. तिघेही वडधामना परिसरातून कामानिमित्त नागपूरच्या दिशेने (एमएच 31/ईएक्स 1246) दुचाकीने जात होते. भरत नगरजवळील महाराजा ढाब्याजवळ भरधाव येणाऱ्या (एमएच-49/ बीझेड-0093) मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातामुळे तिघे रस्त्याच्या कडेला फेकले गेले. आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
हेदेखील वाचा : Chhattisgarh Crime : कुठे नेऊन ठेवलंय पवित्र नातं? शारीरिक संबंध, मद्य अन् संशय…! १०८ दिवसांत ३० पत्नींची हत्या
वाडी पोलिसांच्या मदतीने तिघांनाही तातडीने वाडीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर उत्तमकुमार ठाकूर यांना मृत घोषित केले. इतर दोघांवर मेडीट्रीना रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच फॅक्टरीतील सहकारी व कामगार संघटनांचे पदाधिकारी रुग्णालयात दाखल झाले. अपघातामुळे कामगारांमध्ये व डिफेन्स परिसरात शोककळा पसरली आहे. वाडी पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक निकिता कोठे पुढील तपास करत आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात
दुसऱ्या एका घटनेत, छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली. यात धाब्यावर जेवणासाठी गेलेल्या पाच मित्रांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. शहरातील सिल्लोड रोडवरील मध्यरात्रीच्या सुमारास घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की, यात तीन जण जागीच ठार झाले. तर दोन जण गंभीर स्वरूपात जखमी झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.