पिंपरी चिंचवड: देहू रोड परिसरात एक खळबळ जनक घटना घडली आहे. विवाहबाह्य संबंधाच्या कारणावरून ही हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.एका विवाहित महिला आणि तिच्या प्रिंयकराची हत्या करण्यात आली आहे. ही हत्या महिलेच्या दुसऱ्या पतीने केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव ज्ञानेश्वर साबळे आहे. ज्ञानेश्वर साबळे हा लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे.पत्नीचे विवाहबाह्य संबंध सुरु असतानाच पतीने पाहिले. यातून मध्यरात्री साबळेने पत्नीची आणि तिच्या प्रियकराची सिमेंट ब्लॉकने ठेचून हत्या केली.
साबळेच्या पत्नीचा आधी एक विवाह झाला होता. त्याच्या पत्नीचा प्रियकर मजुरीचे काम करत होता. महिलेला पहिल्या पतीकडून दोन मुलं झाली होती. मात्र त्या पतीच्या मृत्यूनंतर तिने साबळेशी लग्न केलं होत. मात्र काही काळानंतर तिचे विवाहबाह्य संबंध निर्माण झाले. याची कल्पना साबळेला होतीच मात्र मध्यरात्री त्याला पुरावा सापडला. ती राहत्या घरापासून लगतच्या परिसरात हे दोघे आढळले. यानंतर संतापलेल्या ज्ञानेश्वरने या दोघांची हत्या केली. देहूरोड पोलिसांनी ज्ञानेश्वर साबळेला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांकडून याप्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.
भाजप पदाधिकारी प्रमोद कोंढरेंवर महिला पोलीस निरीक्षकाकडून विनयभंगाचा आरोप; एफआयआर दाखल
पुण्यातील राजकीय वर्तुळात संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. भाजपचे पुणे शहर पदाधिकारी प्रमोद कोंढरे यांच्यावर एका महिला पोलीस निरीक्षकाने विनयभंगाचा आरोप करत गुन्हा दाखल (FIR) केला आहे. सोमवारी (23 जून) हा सर्व प्रकार घडला. भाजपच्या कार्यक्रमानंतर कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आणि बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या काही पोलीस कर्मचाऱ्यांना जवळच्याच दुकानात चहा पिण्यासाठी नेले होते. त्यावेळी गर्दीचा फायदा घेत प्रमोद कोंढरे यांनी दोनवेळा अशोभनीय व लज्जास्पद स्पर्श केला, असा आरोप संबंधित महिला पोलीस निरीक्षकाने केला आहे.
संबंधित महिला अधिकाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्यासोबत घडलेला प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजच्या माहितीच्या आधारे, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे तक्रार पोहोचवण्यात आली. त्यानुसार, प्रमोद कोंढरे यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीन लग्न करूनही चौथ्याला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न; सासूला आला संशय आणि तिने केला…..