
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
रविना पवार असं मृत महिलेचं नाव असून ती मंगळूरपीर येथील रहिवासी आहे. तर तिच्या पतीचे नाव सादिक शहा तसरीफ शहा (29) असे आहे. रविना पवारने सादिक शहा तसरीफ शहा याच्यासोबत प्रेमविवाह केला होता. या दाम्पत्याला एक लहान मुलगा असून रविना पवार ही आठ दिवसांची बाळंतीन असल्याचीही माहिती समोर आली आहे. काही कारणास्तव हे दाम्पत्य काही दिवस मुंबईमध्ये राहत होते. त्यानंतर ते अकोल्यात येऊन भाड्याच्या खोलीत राहत असल्याचे समोर आले.
यानंतर पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहितीही तपासात पुढे आली आहे. या वादातूनच सादिकने रविनाचा गळा दाबून हत्या केली. त्यांनतर गुन्हा आणि तिची ओळख लपविण्याचा उद्देशाने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी आरोपी सादिक शहा तसरीफ शहा याला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने अकोला शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. बजरंज दलाच्या कार्यकर्त्यांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहे.
आठ दिवसांचे बाळ चाईल्ड लाईनच्या ताब्यात
धक्कादायक बाब म्हणजे मृत रविना पवारला अवघ्या आठ दिवसांचे बाळ असल्याची माहिती समोर आली आहे. आईच्या मृत्यूनंतर या नवजात बाळाच्या संगोपनाचा प्रश्न निर्माण झाला होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,या आठ दिवसांच्या बाळाला पुढील संगोपनासाठी चाईल्ड लाईनच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
बजरंग दलाने काय म्हटलं?
मंगळूरपीर तालुक्यातील नांदखेड गावातील एक महिलेचा मृतदेह अन्नपूर्णा माता मंदिराजवळ आढळला. हे एक लव्ह जिहादचं प्रकरण असण्याची शक्यता आहे. एका मुस्लीम व्यक्तीने तिची हत्या केली आहे. तिला फूस लावून वर्षभर अकोल्यात ठेवलं. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. ज्याप्रकारे त्या महिलेची हत्या करण्यात आली आणि तिला जाळण्यात आलं, यात एका व्यक्तीचा हात नाहीए. यामध्ये कमीत कमी चार ते पाच व्यक्ती असतील. पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की,याप्रकरणी न्याय मिळावं, अशी प्रतिक्रिया अकोल्याच्या बजरंग दलाचे समन्वयक हरीओम पांडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
Navi Mumbai Crime : “मी दहशतवादी आहे…”, APMC कामगाराच्या बॉम्बच्या खोट्या फोनमुळे नवी मुंबईत घबराट
Ans: अकोल्यातील डाबकी रोड परिसरात अन्नपूर्णा माता मंदिरासमोर सापडला.
Ans: पती सादिक शहा तसरीफ शहा याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Ans: 8 दिवसांचे नवजात बाळ चाईल्ड लाईनच्या ताब्यात देण्यात आले आहे.