
crime (फोटो सौजन्य: social media)
Navi Mumbai: फेसबुकवरून संपर्कात, कोट्यवधी रूपयांचा लोभ अन् तब्बल ₹56.27 लाखांची फसवणूक
व्हिडिओत काय?
आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव गोपाळ पालखेड असं आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडीओ रेकॉर्ड करून ठेवले होते. या व्हिडिओमध्ये गोपाळ यांनी सावकार राकेश भूपेंद्र गांधी आणि सचिन उर्फ बंटी खरळ यांच्याकडून मिळालेल्या जीवघेण्या धमक्यांचा उल्लेख केला आहे. गोपाळ पाटखेडे यांनी २६ नोव्हेंबर २०२५ रोजी यांनी आत्महत्या केली. मृतकाचे भाऊ नागेश पाटखेडे यांनी 28 नोव्हेंबर 2025 रोजी पातूर पोलिसांत तक्रार दाखल केली. तेव्हा नागेश पाटखेडे यांनी तपासणीदरम्यान गोपाल पाटखेडे यांचा मोबाईलची तपासणी केली असता, त्यांना एक व्हिडीओ रेकॉर्डिंग सापडले.
आरोप काय?
गोपाळ पाटखेडे यांच्या तक्रारीनुसार, आरोपी राकेश गांधी यांच्याकडून 20 टक्के व्याजदराने पैसे घेतले होते. गोपाळ यांनी संपूर्ण घेतलेली रक्कम परत केली. तेव्हा आरोपींनी त्यांना धमक्या देऊन त्यांनी त्यांनी मौजा बेलोरा खुर्द येथील सर्व्हे नंबर 72 (Survey No. 72) मधील 40 आर (40 R) शेती जबरदस्तीने खरेदी नोंदवून घेतली. यात दिलीप आप्पाराव देशमुख आणि संतोष बळीराम सावंत यांचे देखील सहकार्य असलयाचे आरोप तक्रारीत करण्यात आले आहे. दस्त क्रमांक 5159/2025 (Document No. 5159/2025) नुसार ही जमीन सावकारी मार्गाने हस्तांतरित झाल्याचा उल्लेख देखील व्हिडीओ मध्ये करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल?
पातूर पोलिसांनी तक्रारीच्या आधारे तात्काळ कारवाई करत राकेश गांधी आणि बंटी खरळ यांच्या विरोधात कलम 108, 352 (BNS) आणि 3(5) (BNS) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. पातूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
Ans: सावकारांकडून सततचा छळ, धमक्या आणि जमीन हिरावून घेतल्यामुळे गोपाळ यांनी टोकाचे पाऊल उचलले.
Ans: राकेश गांधी आणि बंटी खरळ या दोन सावकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ans: मृत्यूपूर्वीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग ज्यात आरोपींचा उल्लेख असल्याचे फिर्यादीत नमूद.