'माझ्याविरोधात इन्स्टाग्रामवर स्टोरी का लावतो' म्हणत तरुणावर धारदार शस्त्राने वार; दोघांचे गळ चिरले अन्...(संग्रहित फोटो)
रांजणगाव : ‘तू माझ्या विरोधात इन्स्टाग्रामवर स्टोरी का लावतो?’ असा जाब विचारत धारदार शस्त्राने मानेवर वार करून जखमी केले. तसेच मध्यस्थी करणाऱ्यावर सुद्धा वार करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना गुरुवारी (दि.४) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रांजणगाव येथे घडली.
बंजारा कॉलनी, रांजणगाव (शेणपुंजी) येथील निखील संतोष राठोड (वय १७) हा शाहू महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिकतो. ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास निखिल व त्याचा मित्र आदित्य मारुती काकडे हे दोघे भुजगवस्ती येथील मित्र आदित्य कुकडे यास फिजिक्सचे पुस्तक देण्यासाठी जात होते. दरम्यान, त्यांना कमळापूर रस्त्यावरील नुराणी मज्जिदजवळ त्यांचा मित्र ओम मनिष नागपुरे हा भेटला. निखिल याने ‘माझ्याविरूद्ध इस्टाग्रामवर स्टोरी का लावतो? याबाबत मनिष याच्याकडे विचारणा केली. काही वाद असेल तर आपण मिटवून घेऊ, तू माझ्याविरूद्ध स्टोरी लावू नको’, असे म्हणाला.
त्यावेळी मनिष नागपुरे याने निखील यास शिवीगाळ करून मारहाण करत त्याच्या मानेवर डाव्या बाजूने धारदार वस्तूने वार करून जखमी केले. यावेळी आदित्य काकडे हा मध्यस्थी करण्यासाठी पडला असता त्याला सुद्धा धारदार वस्तूने वार करून जखमी केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.
जखमींना तातडीने नेले रुग्णालयात
या घटनेत गंभीर जखमी झालेल्या राठोड व काकडे यांना ओमकार तिवारी, पवन गायकवाड यांनी तात्काळ बजाजनगरातील खाजगी रूग्णालयात दाखल केले. दोघांवरही अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. निखिल राठोड याला २३ टाके पडले आहे. तर आदित्य काकडे यांना २६ टाके पडले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
पुण्यातही हल्ल्याची घटना
दुसऱ्या एका घटनेत, पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘माझ्या बायकोकडे का बघतोस’ अशी विचारणा करत एकावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (दि. १७) सकाळी दहा वाजताच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील सिध्दार्थनगरमध्ये घडली आहे.
हेदेखील वाचा : ‘तू जर व्यवस्थित राहिली नाहीस तर हातपाय तोडून टाकीन…’; पैशांसाठी विवाहितेचा छळ






