crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
बदलापूर: बदलापूरच्या शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाला होता. या प्रकरणाचा मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करण्यात आला होता. या प्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे. आरोपीचं एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना निर्दोषत्व बहाल करण्यात आलं आहे. न्यायमूर्ती दिलीप भोसलेंच्या न्यायालयीन आयोगाकडून पोलिसांना क्लीनचिट देण्यात आली आहे. स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदेंवर गोळीबार केल्याचा पोलिसांचा दावा न्या. दिलीप भोसलेंच्या न्यायालयीन आयोगाने मान्य केला आहे.
Gautami Patil: तरुणांना घायाळ करणारी गौतमी हमसून हमसून रडली; म्हणाली, “हे घडले तेव्हा…”
निर्दोषत्व बहाल
मिळालेल्या माहितीनुसार, न्या.दिलीप भोसले आयोगाकडून पोलिसांना क्लीन चीट देण्यात आली आहे. तर अक्षय शिंदेंच्या कुटुंबीयांची तक्रार नसल्यानं मानवाधिकार आयोगाची या आधीच पोलिसांना क्लीन चीट मिळाली होती. मात्र, मुंबई हायकोर्टाकडून मात्र एसआयटी स्थापन करुन चौकशीचे आदेश देण्यात आले होते. कोर्टाने नव्हे तर डीजीपींन एसआयटी स्थापन करावी, असे सुप्रीम कोर्टाचे आदेश होते. अशातच आता आरोपीचं एनकाऊंटर करणाऱ्या पोलिसांना न्या.दिलीप भोसले आयोगाकडून निर्दोषत्व बहाल करण्यात आलं आहे.
नेमकं काय प्रकरण
ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आले होते. दरम्यान, २३ सप्टेंबर २०२४ रोजी तळोजा तुरुंगात जात असतांना पोलीस चकमकीत अक्षय शिंदेंचा मृत्यू झाला होता. हा एन्काऊंटर फेक असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे या प्रकरणाचा तपास एसआयटी स्थापन करुन करण्यात आला होता. त्यानंतर याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणातील जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सरकारी वकिल हितेने वेणेगावकर यांनी 3 मे पर्यंतची मुदत मागितली होती. ही मदत शनिवारी संपली होती. मात्र, तरीही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या 7 एप्रिलच्या आदेशाविरोधात राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
कारागृहातच कैद्याची आत्महत्या; लोखंडी गजाला जोरदार धडक दिली अन् जखमी होताच…
कारागृहात शिक्षा भोगत असताना कैद्याने आत्महत्या केल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. त्यातच आता परंडा येथे एका खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा लागलेल्या एका कैद्याची रवानगी हसूल कारागृहात करण्यात आली होती. कारागृहातील दीड महिन्याच्या कालावधीत कैद्याने लोखंडी गजाला जोरदार धडक घेऊन स्वतःला जखमी करून घेतले होती. या कैद्यांवर उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.