गौतमी पाटीलचे अपघात प्रकरणावर भाष्य (फोटो- सोशल मीडिया)
Gautami Patil News : पुणे : नृत्यांगणा गौतमी पाटील हे सध्या जोरदार चर्चेत आली आहे. अनेकदा अश्लील नृत्यामुळे चर्चेमध्ये आलेली गौतमी पाटील (Gautami Patil) हे आता अपघाताच्या प्रकरणामध्ये अडकली आहे. याबाबत आता रिक्षा चालकाच्या कुटुंबाने काही आरोप केले होते. पुण्यातील अपघातामध्ये पुणे पोलिसांनी गौतमी पाटीलला क्लीनचीट दिली आहे. दरम्यान या सगळ्या प्रकरणावर गौतमी पाटील हिने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नेमके प्रकरण काय?
पुण्यातील पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाजवळ गौतमी पाटीलच्या कारने एका रिक्षाला धडक दिली होती. यामध्ये रिक्षा चालक आणि बसलेले प्रवासी जखमी झाले. रिक्षा चालकावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान हा अपघात घडला तेव्हा गौतमी पाटील गाडीत बसलेली नव्हती असे समोर येत आहे. या प्रकरणात चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांना फोन केला आणि गौतमी पाटीलला उचलायचं की नाही अशी विचारणा केली आहे. त्याबाबतच चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांना त्याबाबत कारवाई करण्याच्या सूचना देखील केल्या होत्या. दरम्यान पुणे अपघात प्रकरणात पोलिसांनी गौतमी पाटीलला क्लीनचीट दिली आहे.
काय म्हणाली गौतमी पाटील?
पुणे अपघात प्रकरणावर बोलताना गौतमी पाटील म्हणाली, “ही सगळे घडले तेव्हा मी गाडीत नव्हते. माझी गाडी ड्रायव्हरकडे होती. मला ही घटना काळलाई तेव्हा मी माझे मानलेले भाऊ आहेत, त्यांना तिथे पाठवले. मी मदतीचा हात पुढे केला. मात्र त्या कुटुंबाने आम्ही कायदेशीर पद्धतीने पुढे जाऊ असे सांगितले.
Gautami Patil Pune: पुण्यातील ‘त्या’ अपघातावेळी गौतमी पाटील कारमध्ये होती? समोर आली धक्कादायक माहिती
आज माझे नाव बदनाम केले जात आहे. माझ्या काही संबंध नसताना देखील मला ट्रोल केले जात आहे. मी माझ्याकडून पोलिसांना पूर्णपणे सहकारी केले आहे. जे कायदेशीर आहे ते मी करत आहे.