Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Alibaug Crime: 36 तासांत चोरीचा उलगडा! रेवदंडा पोलिसांनी ओडिशातील आरोपीला दुचाकीसह पकडलं

अलिबाग तालुक्यातील खानाव येथून चोरीला गेलेली TVS Ntorq दुचाकी रेवदंडा पोलिसांनी अवघ्या 36 तासांत शोधून काढली. सीसीटीव्ही फुटेज, नियंत्रण कक्ष आणि महामार्ग पोलिसांच्या मदतीने नाकाबंदी करून ओडिशातील आरोपीला चोरीच्या दुचाकीसह अटक करण्यात आली. या कारवाईमुळे रेवदंडा पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 20, 2026 | 03:23 PM
crime

crime

Follow Us
Follow Us:
  • खानाव येथून चोरीला गेलेली दुचाकी 36 तासांत हस्तगत.
  • सीसीटीव्ही आणि नाकाबंदीच्या मदतीने ओडिशातील आरोपीला अटक.
  • रेवदंडा पोलिसांच्या विशेष पथकाची यशस्वी कारवाई.
अलिबाग : रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे खानाव (ता. अलिबाग) येथून चोरीस गेलेली दुचाकी अवघ्या ३६ तासांत शोधून काढत रेवदंडा पोलिसांनी ओडिशातील आरोपीला अटक केली असून चोरीस गेलेली मोटारसायकल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. खानाव येथील जितेश भास्कर पाटील (वय ३३) यांनी दि. १६ जुलै २०२६ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास त्यांची TVS Ntorq 125 (क्रमांक MH-06-CS-8745) ही दुचाकी घराच्या अंगणात उभी केली होती. मात्र, दि. १७ जुलै रोजी पहाटे १.२८ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली.

आज तुला मारून टाकतो, तुझे तुकडे करून…; काकाचा पुतण्यावर चाकूने जीवघेणा हल्ला

याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गडदे यांनी या गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी माया मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अंगाज यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची नियुक्ती केली.

तपासादरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये आरोपी चोरीची दुचाकी घेऊन पेण–पनवेल मार्गे जात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षामार्फत पेण–पनवेल विभागातील वाहतूक पोलिसांना तात्काळ बिनतारी संदेश देण्यात आला. महामार्ग वाहतूक पोलीस केंद्र पळस्पे यांच्या सहकार्याने नाकाबंदी करण्यात आली.

या संयुक्त कारवाईत पोलीस हवालदार मनीष ठाकूर, पोलीस हवालदार तुषार पारवे, पोलीस नाईक केदारनाथ साखरकर आणि पोलीस शिपाई समीर धुरी यांनी आरोपी शंकर मंगल गिलवा (वय ३३, रा. चम्पागड, ता. राऊरकेला, जि. सुंदरगड, राज्य ओडिशा) याला चोरीच्या MH-06-CS-8745 क्रमांकाच्या दुचाकीसह ताब्यात घेतले. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मनीष ठाकूर करीत आहेत.

Ketan Agrawal Case: ‘He Is Caring and Kind’… साखरपुड्यात केतनचं कौतुक करणाऱ्या सियाचा VIDEO Viral; महिनाभरानंतर नवा ट्विस्ट

💡

Frequently Asked Questions

  • Que: चोरीला गेलेली दुचाकी किती वेळात शोधण्यात आली

    Ans: अवघ्या 36 तासांत.

  • Que: आरोपीला कुठल्या राज्यातील असल्याचे समोर आले?

    Ans: ओडिशा.

  • Que: आरोपीला कशाच्या आधारे पकडण्यात आले?

    Ans: सीसीटीव्ही फुटेज, नियंत्रण कक्षाची माहिती आणि नाकाबंदीच्या मदतीने.

Web Title: Alibag crime theft solved within 36 hours revdanda police apprehend accused from odisha along with the stolen two wheeler

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 01:57 PM

Topics:  

  • Alibag
  • alibaug crime
  • crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
2

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
3

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
4

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.