नेमक काय घडलं?
सिया अग्रवाल आणि केतन चौधरी (वय २६) यांचा विवाह डिसेंबरमध्ये होणार होता, त्याआधीच सियाने आपल्या प्रियकराच्या मदतीने लोहगडावरुन केतनला ढकलून दिले. प्रेमप्रकरणामुळे हे लग्न सियाला मान्य नव्हते त्यामुळेच तिने केतनची हत्या केल्याचे समोर आले आहे. त्याच्या हत्या प्रकरणाला 18 जुलै रोजी एक महिना पूर्ण झाला आहे. केतन अग्रवालच्या होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी कट रचून ४०० फूट दरीत ढकलून हत्या केली . सुरवातीला हा अपघात असल्याचे भासवले गेले, मात्र पोलिसांनी कसून तपास केल्यावर हे पूर्वनियोजित हत्याकांड असल्याचे उघड झाले. आरोपींनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात वडगाव न्यायालयाने दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडी वाढवली आहे. केतनच्या कुटुंबियांनी दोघांच्या लग्नाची जय्यत तयारी केली होती. मोठ्या थाटामाटात दोघांचा साखरपुडा पार पडला होता. या साखरपुड्यातील एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे.
व्हिडिओत काय?
या समोर आलेल्या नवीन व्हिडिओमध्ये सिया आणि केतन साखरपुड्याच्या सोहळ्यात स्टेजवर उभं असल्याचे दिसत आहे. यावेळी कार्यक्रमाची निवेदिका तिला केतन तुला का आवडतो? असा सवाल करते. यावेळी सिया “He Is Caring and Kind” असे म्हणत केतनच्या स्वभावाचे कौतुक करताना दिसते. हा जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून विविध स्तरांतून त्यावर चर्चा सुरू आहे. सियाचे हे शब्द ऐकून केतनही हसतो.
Pune Crime : रुग्णालयाच्या बिलावरून वाद; सामाजिक कार्यकर्त्याला डॉक्टरकडून पिस्तूलाचा धाक?
Ans: केतन आणि सियाच्या साखरपुड्याचा व्हिडिओ.
Ans: He Is Caring and Kind.
Ans: डिलीट केलेले चॅट्स, सांकेतिक संवाद आणि डिजिटल पुरावे.






