Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ambarnath Crime: थरकाप उडवणारी घटना! वरवंट्याने डोक्यावर वार, गुप्तांगावर…; 7 वर्षीय मुलाची आईच्या प्रियकराकडून हत्या

अंबरनाथ पश्चिमेतील लादी नाका परिसरात आईसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रियकराने 7 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. शारीरिक संबंधात मुलगा अडथळा ठरत असल्याच्या रागातून आरोपीने वरवंट्याने मारहाण केली. उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला. आरोपीला अटक करण्यात आली...

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 22, 2026 | 03:03 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • अंबरनाथमध्ये आईच्या लिव्ह-इन पार्टनरने 7 वर्षीय हुसनैनची वरवंट्याने मारहाण करून हत्या केल्याचा आरोप.
  • शारीरिक संबंधात मुलगा अडथळा ठरत असल्याच्या रागातून आरोपीने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात समोर.
  • आरोपी विकास सिंह अटकेत असून, आईचा या गुन्ह्यात सहभाग होता का, याचा पोलीस तपास सुरू.
अंबरनाथ: अंबरनाथ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ७ वर्षीय मुलाची आईच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. त्याने सर्वात आधी वरवंट्याने चिमुकल्याच्या डोक्यावर वार केले, त्यांनतर त्याने गुप्तांगावर आणि शरीरावर अमानुष मारहाण करून निर्घृण हत्या केली. या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी म्हणजेच प्रियकराला अटक केली आहे. मात्र त्याने त्या चिमुकलीची हत्या का केली याचा तपास पोलीस करत आहे.

Bengaluru Crime : Gemini AI ला विचारून रचला तिहेरी हत्येचा कट; आधी आंधळं कसं….; लिव्ह-इन पार्टनरसह दोघे अटकेत

काय घडलं नेमकं?

घडलेली घटना अंबरनाथ पश्चिमेतील लादी नका परिसरात घडली. सकीना कुरेशी असे मृत चिमुकल्याच्या आईचे नाव आहे. तर तिच्या प्रियकराचे नाव विकास सिंह असे आहे. सकीना आणि विकास हे दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यांच्यासोबत त्यांचा सात वर्षांचा मुलगा हुसनैन राहत होता. हुसनैन घरात असल्याने दोघांच्या शारीरिक संबंधात सतत अडथळा निर्माण होत होता. यावरून आरोपी विकास सिंह प्रचंड चिडला होता. याच रागातून विकासने हुसनैनवर जीवघेणा हल्ला केला. त्याने चिमुकल्याच्या डोक्यावर वरवंट्याने जोरदार प्रहार केले तसेच त्याच्या गुप्तंगावर आणि शरीरावर अमानुष मारहाण केली.

यात हुसनैन हा गंभीर जखमी झाला आहे. तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला मुंबईच्या केईएम (KEM) रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तेथे उपचारादरम्यान पहाटेच्या सुमारास चिमुकल्या हुसनैनची प्राणज्योत मालवली. यांनतर आरोपी विकास सिंह आणि चिमुकल्याचा आई सकीना कुरेशी या दोघांनी हे निर्घृण कृत्य लपवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विकास सिंह याला अटक केली असून न्यायालयाने त्याला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. चिमुकल्याची आई सकीना हिने हे कृत्य लपवण्यात हिची काही मदत किंवा सहभाग होता का, या अँगलने देखील पोलीस सध्या सखोल तपास करत आहेत. या घटनेने अंबरनाथ हादरला आहे.

Mumbai Crime: पंचर काढताना चोराने मारला डल्ला; 111 लाख 55 हजार रुपये केले लंपास; अवघ्या २४ तासात आरोपी जेरबंद

💡

Frequently Asked Questions

  • Que: 7 वर्षीय मुलाची हत्या कोणी केल्याचा आरोप आहे?

    Ans: आईचा लिव्ह-इन पार्टनर विकास सिंह.

  • Que: आरोपीला पोलिसांनी अटक केली का?

    Ans: होय, आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

  • Que: या प्रकरणात पोलिसांचा पुढील तपास कशावर सुरू आहे?

    Ans: बालकाच्या आईचा गुन्हा लपवण्यात किंवा हल्ल्यात काही सहभाग होता का, याचा तपास सुरू आहे.

Web Title: Ambarnath crime a chilling incident head struck with a grinding stone blows to the genitals 7 year old boy murdered by mothers lover

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 03:03 PM

Topics:  

  • Ambarnath
  • Ambernath Crime case
  • crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
2

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
3

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
4

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.