फिर्यादी यांना काही वेळानंतर त्यांच्या पैशांची बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ काशीगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तक्रार प्राप्त होताच काशीगाव पोलिसांनी क्षणाचा ही विलंब न करता डिटेक्शन पथकाला घटनास्थळी रवाना केले. पोलिसांनी घटनास्थळ व परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासले. तपासादरम्यान संशयित आरोपीची ओळख पटली. त्यानंतर आरोपी ज्या मार्गाने गेला होता त्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. जवळपास दीडशे सीसीटीव्ही तपासल्यानंतर आरोपी सातत्याने मिरा-भाईंदर परिसरात फिरताना दिसत होता. काही वेळ तो नया नगर येथील व्होकार्ड हॉस्पिटल परिसरातील एका इमारतीत गेल्याचे सीसीटीव्हीत स्पष्ट झाले.
पोलिसांनी संबंधित इमारतीची माहिती घेत आरोपीच्या घराचा शोध लावला. आरोपीने चोरीची पैशांची बॅग घरात लपवून ठेवल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर डिटेक्शन पथकाने तातडीने कारवाई करून आरोपीला अटक केली. आरोपीकडून चोरीस गेलेली 11 लाख 55 हजार रुपयांची संपूर्ण रक्कम (100 टक्के) जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
Ans: मिरा रोड येथील बाबा टायर्ससमोर.
Ans: 11 लाख 55 हजार रुपये.
Ans: सुमारे 150 CCTV फुटेज तपासून.






