Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ambenali Ghat Accident: आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ ८०० फूट खोल दरीत कोसळली; 8 मित्रांची अकाली एक्झिट

Ambenali Ghat Accident: दरीची प्रचंड खोली, घनदाट जंगल, निसरडा उतार आणि अंधारामुळे बचावकार्य अत्यंत आव्हानात्मक ठरले. तरीही बचाव पथकांनी जीवाची पर्वा न करता दोरांच्या सहाय्याने दरीत उतरून वाहनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.

  • By अनुराधा धावडे
Updated On: May 25, 2026 | 11:36 AM
Ambenali Ghat accident news, Mahabaleshwar Poladpur

Ambenali Ghat accident news, Mahabaleshwar Poladpur

Follow Us
Close
Follow Us:
  • आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ   तब्बल ८०० फूट खोल दरीत कोसळली
  • सकाळपासूनही बचावकार्य युद्धपातळीवर सुरूच
  • महाबळेश्वर, पोलादपूर, वाई, सातारा, खटाव आणि परिसरात शोककळा
Ambenali Ghat Accident: महाबळेश्वर–पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण सातारा जिल्हा हादरून गेला आहे. एमएच ११ डीएन २३४० क्रमांकाची स्कॉर्पिओ आंबेनळी घाटातील तब्बल ८०० फूट खोल दरीत कोसळल्याने वाहनातील आठ जणांच्या मृत्यूची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या हृदयद्रावक दुर्घटनेमुळे अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुंभरोशी परिसरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर पोलादपूर हद्दीतील आंबेनळी घाटात हा अपघात घडला. प्राथमिक तपासानुसार ही दुर्घटना रविवारी मध्यरात्री ते सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली असावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. वाहनातील प्रवाशांशी संपर्क होत नसल्याने त्यांच्या नातेवाईकांनी पोलादपूर पोलीस ठाण्यात धाव घेत वाहनाचा शोध घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर पोलिसांनी मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक माहितीच्या आधारे शोधमोहीम सुरू केली. तपासादरम्यान एमएच ११ डीएन २३४० ही स्कॉर्पिओ खोल दरीत कोसळल्याचे स्पष्ट झाले.

लाखाे उमेदवारांचे टेन्शन वाढले? SSC GD कॉन्स्टेबल परीक्षेच्या तारखेत अचानक झाला बदल; जाणून घ्या नवीन

प्राथमिक माहितीनुसार, अपघातग्रस्त वाहनातील प्रवासी सातारा जिल्ह्यातील विविध भागांतील रहिवासी होते. त्यामध्ये आसगाव येथील रितेश राजेंद्र लोखंडे (वय २२), सुहास जितेंद्र लोखंडे (वय २०), महेश अनिल पवार (वय २५) व आदित्य अशोक साळुंखे (वय २१), मर्ढे येथील करण आनंद शिंगटे (वय २१) व निखिल अभिमन्यू शिंगटे (वय २५), खटाव येथील वाहन चालक संदीप अशोक काटकर (वय ३७) तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील बोरगाव येथील अंश समीर चव्हाण (वय १९) यांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, प्रशासनाकडून अद्याप अधिकृत ओळख जाहीर करण्यात आलेली नाही.

घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस, महसूल विभाग आणि विविध स्वयंसेवी बचाव संस्थांची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. दरीची प्रचंड खोली, घनदाट जंगल, निसरडा उतार आणि अंधारामुळे बचावकार्य अत्यंत आव्हानात्मक ठरले. तरीही बचाव पथकांनी जीवाची पर्वा न करता दोरांच्या सहाय्याने दरीत उतरून वाहनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.

या मोहिमेत प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम, महाबळेश्वर ट्रेकर्स, सह्याद्री ट्रेकर्स तसेच महाड येथील सिस्केप रेस्क्यू टीम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. रविवारी रात्री सुरू झालेली शोधमोहीम रात्रभर अखंड सुरू होती. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बचाव पथकाला एका मृतदेहाला दरीतून बाहेर काढण्यात यश आले. संबंधित मृतदेह शवविच्छेदनासाठी पोलादपूर येथे पाठविण्यात आला असून त्याची ओळख पटविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

घटनेची गंभीरता लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) शंकर काळे, पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांनी घटनास्थळी भेट देत बचावकार्याचा आढावा घेतला. विविध यंत्रणांमध्ये समन्वय राखून शोधमोहीम अधिक वेगाने आणि सुरक्षितपणे राबविण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

सोमवारी सकाळपासूनही बचावकार्य युद्धपातळीवर सुरूच आहे. दरीच्या खोल भागात वाहन अडकले असल्याने विशेष तांत्रिक उपकरणे, सुरक्षा दोर आणि प्रशिक्षित बचाव कर्मचाऱ्यांच्या मदतीने शोधकार्य सुरू ठेवण्यात आले आहे. उर्वरित सात जणांचा शोध घेण्यासाठी पथके सातत्याने प्रयत्न करत असून प्रत्येक घडामोडीकडे नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांचे लक्ष लागून आहे.

लाखाे उमेदवारांचे टेन्शन वाढले? SSC GD कॉन्स्टेबल परीक्षेच्या तारखेत अचानक झाला बदल; जाणून घ्या नवीन

या हृदयद्रावक दुर्घटनेमुळे महाबळेश्वर, पोलादपूर, वाई, सातारा, खटाव आणि परिसरात शोककळा पसरली आहे. तरुणांनी भरलेली स्कॉर्पिओ काळाच्या पडद्याआड गेल्याने संपूर्ण जिल्हा सुन्न झाला असून अनेक कुटुंबांचे आधार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

अपघाताचा नेमका घटनाक्रम आणि कारण शोधण्यासाठी पोलीस तपास सुरू असून घाटातील तीव्र वळणे, रात्रीचा प्रवास, वाहनाचा वेग किंवा वाहनावरील नियंत्रण सुटणे यासह विविध शक्यतांचा तपास केला जात आहे.

दरम्यान, बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर आणि अधिकृत पंचनामा झाल्यानंतरच मृतांचा अंतिम आकडा, ओळख आणि अपघाताचे नेमके कारण जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, आंबेनळी घाटातील या भीषण दुर्घटनेने संपूर्ण सातारा जिल्हा शोकमग्न झाला असून खोल दरीत सुरू असलेल्या बचावकार्याच्या प्रत्येक घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

 

 

Web Title: Ambenali ghat horror scorpio plunges 800 feet deep into gorge near mahabaleshwar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 11:36 AM

Topics:  

  • Accident News
  • Mahabaleshwar News
  • Satara News

संबंधित बातम्या

Accident News : रिव्हर्स घेतलेल्या कारच्या धडकेत 10 वर्षाच्या मुलीचा मृत्यू; दोघे जखमी
1

Accident News : रिव्हर्स घेतलेल्या कारच्या धडकेत 10 वर्षाच्या मुलीचा मृत्यू; दोघे जखमी

वन विभागाची ‘धडाकेबाज’ कारवाई! घोरपडीच्या अवयवांसह तस्कर जेरबंद, शिकाऱ्यांच्या मनात उडाली धडकी
2

वन विभागाची ‘धडाकेबाज’ कारवाई! घोरपडीच्या अवयवांसह तस्कर जेरबंद, शिकाऱ्यांच्या मनात उडाली धडकी

Satara News: भाजप नगरसेवकांना दोन्ही राजेंची तंबी “अंतर्गत वाद बाजूला ठेवा; विकासकामांवर लक्ष केंद्रित करा”
3

Satara News: भाजप नगरसेवकांना दोन्ही राजेंची तंबी “अंतर्गत वाद बाजूला ठेवा; विकासकामांवर लक्ष केंद्रित करा”

पीएमपीएमएल बसच्या धडकेत सफाई कामगाराचा मृत्यू, संघटना आक्रमक; 10 लाख रुपये भरपाईची मागणी
4

पीएमपीएमएल बसच्या धडकेत सफाई कामगाराचा मृत्यू, संघटना आक्रमक; 10 लाख रुपये भरपाईची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.