फोटो सोजन्य- सोशल मीडिया
SSC GD Constable Exam Date 2026 Changed: एसएससी जीडी (SSC GD) कॉन्स्टेबल भरती परीक्षेची तयारी करत असणाऱ्या लाखो उमेद्वारांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. कर्मचारी निवड आयोगाने परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करत नवीन तारीख जाहीर केली आहे.
आयोगाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, आधी ही परीक्षा २८ मे २०२६ रोजी आयोजित केली जाणार होती. मात्र, आता यामध्ये आयोगाने बदल करत ती २७ मे २०२६ ही निश्चित केली आहे. त्यामुळे उमेद्वारांना आता आपल्या तयारीसाठी आणि प्रवासाच्या नियोजनात आवश्यक ते बदल करावे लागणार आहेत.
एसएससी आयोगाने परीक्षेच्या तारखेत बदल करण्यापाठीमागे सरकारी सुट्टीचे कारण दिले आहे. २८ मे २०२६ रोजी ईद उल जुहा (बकरी ईद) ची सुट्टी असल्याने नियोजित भरतीच्या तारखेत बदल करणे आवश्यक असल्याचे सांगितले. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून सुट्ट्यांच्या कॅलेंडरमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे, पुर्वी निश्चित केलेल्या तारखेमुळे प्रशासकीय व्यवस्था आणि उमेद्वारांची गैरसोय टाळण्यासाठी आयोगाने ही परीक्षा २७ मे २०२६ रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, SSC GD कॉन्स्टेबल परीक्षा २०२६ चे प्रवेशपत्र (एडमिट कार्ड) परीक्षेच्या साधारण २ ते ३ दिवस आधी जारी केले जाईल. उमेद्वारांना एसएससीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपल्या लॉगिनवर सर्व आवश्यक तपशील भरून प्रवेशपत्र डाऊनलोड करता येईल.
या प्रवेशपत्रावर परीक्षा केंद्र, रिपोर्टिंगची वेळ आणि इतर महत्त्वाच्या सूचना दिलेल्या असतील. ही भरती परीक्षा केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (CAPFs), एसएसएफ (SSF) आणि आसाम रायफल्समधील रायफलमन (जीडी) यांसह विविध पदांसाठी आयोजित केली जात असते. या भरती प्रक्रियेत दरवर्षी देशभरातील लाखो तरुण या परीक्षेत सहभागी होतात.






