Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाई येथील डॉक्टरांचा तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा; आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टर व परिचारिकेवर झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ वाईतील विविध वैद्यकीय संघटनांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदेशीर उपाययोजना व प्रभावी सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

  • By विवेक
Updated On: Jul 10, 2026 | 08:50 PM
वाई येथील डॉक्टरांचा तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा; आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी निवेदन

वाई येथील डॉक्टरांचा तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा; आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी निवेदन

Follow Us
Follow Us:

वाई, दि. १० जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर व परिचारिका कर्मचाऱ्यांवर झालेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी वाई येथील सर्व वैद्यकीय संघटनांच्या वतीने तहसीलदार व प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

या आंदोलनात इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA), नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (NIMA), जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, इंडियन डेंटल असोसिएशन, होमिओपॅथी असोसिएशन, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, प्रयोगशाळा तंत्रज्ञ संघटना, फिजिओथेरपिस्ट असोसिएशन, तसेच सरकारी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

निवेदनात डोंबिवली येथील घटनेतील दोषींवर तात्काळ व कठोर कारवाई करावी, पीडित महिला डॉक्टर व परिचारिकांना न्याय व संरक्षण द्यावे, सर्व शासकीय, महापालिका व खासगी रुग्णालयांमध्ये डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रभावी सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षक व तातडीची पोलिस प्रतिसाद यंत्रणा कार्यान्वित करावी, तसेच आरोग्यसेवा संस्थांमधील हिंसाचार रोखण्यासाठी विद्यमान कायद्यांची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली.

Satara News : राजवाडा पशुवैद्यकीय रुग्णालयाची जागा नगरपालिकेकडे; जिल्हा परिषदेत जोरदार राडा! राजू भोसले-राजू शेळके आमनेसामने

आयएमए महाराष्ट्र राज्याच्या आवाहनानुसार या निषेध आंदोलनादरम्यान डॉक्टरांनी काळ्या फिती लावून शांततामय पद्धतीने निषेध नोंदविला. रुग्णसेवा व आपत्कालीन वैद्यकीय सेवा पूर्ववत सुरू ठेवण्यात आल्या.

या निवेदनावर आयएमए वाई शाखेच्या अध्यक्षा डॉ. मंगला आहिवळे, सचिव डॉ. लता पाटील,राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ सतिश बाबर तसेच इतर पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हिंसाचार थांबवण्यासाठी शासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Satara News : वाईच्या पश्चिम भागातील उत्खनन प्रकरण तापले; दोषींवर कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

यावेळी डॉ. सागर चक्के, डॉ.संगीता सुरवसे,डॉ.अरविंद सुरवसे,डॉ. मदन जाधव,डॉ.आशा बाबर , डॉ. जे. एस. कात्रे, डॉ. एम. डी. मेनबुदले डॉ. वन्नम एल. जे,डॉ.संदीप गोळे,डॉ. गजानन गव्हाणे, डॉ. रमेश तायडे , डॉ. राहुल पोतदार , डॉ. सचिन जाधव, डॉ. गजेंद्र पाटील, डॉ.शिवानी जमदाडे,डॉ.शिवाजी कदम,डॉ.निलम भोसले.डॉ.आनंद भोसले, डॉ. पंकज पिसाळ, डॉ. मीनाक्षी जाधव,दिपक बागडे संतोष निकम,डॉ. मनीषा निकम, डॉ.नवल जाधव, डॉ.सिद्धांत कद्दू,डॉ.ऋचा कद्दू केदारे,यांच्यासह विविध वैद्यकीय संघटनांचे पदाधिकारी, डॉक्टर, नर्सेस, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फिजिओथेरपिस्ट व केमिस्ट प्रतिनिधी उपस्थित होते.

Web Title: Wai doctors protest dombivli doctor assault health worker security

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 08:50 PM

Topics:  

  • Doctors News
  • Satara
  • Satara News
  • Wai News

संबंधित बातम्या

Sangli Bank Election : सातारा बँकेच्या निकालाने सांगलीत खळबळ; चार संचालकांच्या उमेदवारीवर टांगती तलवार?
1

Sangli Bank Election : सातारा बँकेच्या निकालाने सांगलीत खळबळ; चार संचालकांच्या उमेदवारीवर टांगती तलवार?

Satara News : सातारा जिल्हा बँक निवडणुकीत न्यायालयीन ट्विस्ट! १० उमेदवारांच्या पात्रतेची चर्चा; २१ ऑक्टोबरकडे लक्ष
2

Satara News : सातारा जिल्हा बँक निवडणुकीत न्यायालयीन ट्विस्ट! १० उमेदवारांच्या पात्रतेची चर्चा; २१ ऑक्टोबरकडे लक्ष

Satara News : उसाला प्रतिटन ५ हजारांचा दर द्या; अन्यथा उपोषणाचा इशारा, प्रकाश साबळे आक्रमक
3

Satara News : उसाला प्रतिटन ५ हजारांचा दर द्या; अन्यथा उपोषणाचा इशारा, प्रकाश साबळे आक्रमक

Maharashtra Drought: साताऱ्यावर पाणीटंचाईचे सावट! १० टक्के पाणीकपातीचा आदेश; पालिकेने उचलली महत्त्वाची पावले
4

Maharashtra Drought: साताऱ्यावर पाणीटंचाईचे सावट! १० टक्के पाणीकपातीचा आदेश; पालिकेने उचलली महत्त्वाची पावले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.