Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलीच्या चारित्र्यावर होता संशय; अमृतसरमध्ये बापाने हत्या करून मृतदेह घरामागे पुरला, आईने जेसीबीने खोदकाम करत सत्य केलं उघड

पंजाबच्या अमृतसरमध्ये वडिलांनीच मुलीची हत्या करून तिचा मृतदेह घरामागे पुरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आईच्या संशयानंतर जेसीबीच्या मदतीने खोदकाम करण्यात आले आणि १९ वर्षीय नवनीत कौरचा मृतदेह सापडला.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 03, 2026 | 10:26 AM
मुलीच्या चारित्र्यावर होता संशय; अमृतसरमध्ये बापाने हत्या करून मृतदेह घरामागे पुरला, आईने जेसीबीने खोदकाम करत सत्य केलं उघड

मुलीच्या चारित्र्यावर होता संशय; अमृतसरमध्ये बापाने हत्या करून मृतदेह घरामागे पुरला, आईने जेसीबीने खोदकाम करत सत्य केलं उघड

Follow Us
Follow Us:
  • नवनीत सहा महिन्यांपूर्वी प्रियकरासोबत घरातून निघून गेली होती.
  • घरामागे खोदलेल्या खड्ड्यात नवनीतचा मृतदेह सापडला.
  • हत्या आणि मृतदेह लपवल्याप्रकरणी वडिलांविरोधात गुन्हा दाखल.
पंजाबच्या अमृतसरमध्ये एका संशयावरुन वडिलांनी स्वत:च्याच मुलीची हत्या केल्याची घटना समोर येत आहे. ही घटना मत्तेलाल पोलिस ठाण्याच्या परिसरात घडून आली असून प्रकरणाचा खुलासा खुद्द मुलीने आईने केला आहे. संशय आल्याने आईने जेसीबी बोलावून घराच्या मागच्या बाजूस खोदकाम सुरु केले जिथे तिला मुलीचा मृतदेह सापडला. मुलीचे वय १९ वर्षे असून तिचे ओळख नवनीत काैर अशी पटली आहे. पोलिसांनी या घटनेची दखल घेत नवनीतच्या मृतदेहाला आपल्या ताब्यात घेतले आहे. मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, रिपोर्ट समोर आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण समोर येईल. सध्या पोलिसांनी वडिलांविरोधात हत्या आणि मृतदेह लपविण्याचा आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

Pune Crime News: एसी कोचमध्ये महिला झोपली अन् बॅग गायब! ATM कार्डने 80 हजारांवर डल्ला,दोघे पोलिसांच्या ताब्यात

प्रियकरासोबत पळून गेली होती मुलगी

मृत मुलीच्या आईचे नाव सरबजीत काैर असून तिने पोलिसांना सागितले की, मोठी मुलगी नवनीत काैर हिचे शिक्षण पूर्ण झाले होते. साधरण सहा महिन्यांपूर्वी ती आपल्या प्रियकरासोबत घरातून निघून गेली होती पण काही दिवसांनीच ती पुन्हा घरी परतली. यावरुनच घरात नवरा-बायकोत भांडण व्हायची. सुरबजीत काैर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिचा नवरा दोन्ही मुलींच्या चारित्र्यावर शंका घ्यायचा. २५ ऑगस्ट रोजी ती आपल्या माहेरी गेली असताना घरात दोन्ही मुली उपस्थित होत्या. ३१ ऑगस्ट रोजी मुलीने आईला फोनवर सांगितले की, वडिल घराच्या मागच्या बाजूला मोठा खड्डा खोदत आहेत. यानंतर त्यांचे मुलीशी बोलणे होऊ शकले नाही.

आईला सांगितली खोटी कहाणी

बुधवारी जेव्हा सरबजीत काैर माहेरुन घरी परतली तेव्हा तिला मुलगी नवनीत घरात दिसली नाही. तिने पतीकडे नवनीतची चाैकशी केली असता सहा महिन्यांसाठी तिला नातेवाईकांकडे पाठवले असल्याचे पतीने सांगितले. पतीच्या या दाव्यावर सरबजीतला विश्वास बसला नाही आणि यानंतर तिने पोलिसांनी घटनेची माहिती दिली. संशयाच्या आधारावर घरामागे खड्डा खोदण्यासाठी जेसीबीचा वापर करण्यात आला. खोदकामादरम्यान खड्ड्यातून नवनीतचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार, साधारण दोन दिवसांपूर्वी हत्या केल्यानंतर नवनीतचा मृतदेह त्या खड्ड्यात पुरण्यात आला होता.

फलटणमध्ये शोक आणि संताप! मुंबईहून मृतदेह आणताच गर्दी, आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत अंत्यविधी न करण्याचा निर्णय

पोलिसांचा तपास सुरु

पोलिसांनी या प्रकरणात घटनास्थळावरुन काही पुराने गोळा करुन नवनीतच्या मृतदेहाला पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पोलिस सध्या हत्येमागचे कारण, आरोपीची चाैकशी आणि संबंधित तथ्यांचा तपास करत आहेत. शवविच्छेदन अहवाल आणि तपासाच्या आधारावरच पुढील कायदेशीर कारवाई पार पडेल.

 

Web Title: Amritsar father kills 19 year old daughter buries body in backyard crime news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 10:15 AM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Punjab

संबंधित बातम्या

Rahul Gandhi On Delhi Crime: ४७ किमी प्रवास अन् पोलिसांना खबर नाही; दिल्ली सामूहिक बलात्कारावर राहुल गांधींचा घणाघात
1

Rahul Gandhi On Delhi Crime: ४७ किमी प्रवास अन् पोलिसांना खबर नाही; दिल्ली सामूहिक बलात्कारावर राहुल गांधींचा घणाघात

धक्कादायक ! पूजेच्या बहाण्याने विवाहितेवर अत्याचार; बेडरूममध्ये दोष असल्याचे सांगत आत नेलं अन्…
2

धक्कादायक ! पूजेच्या बहाण्याने विवाहितेवर अत्याचार; बेडरूममध्ये दोष असल्याचे सांगत आत नेलं अन्…

अडीच लाख रुपये दे, अन्यथा बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवेन; तरुणीची व्यावसायिकाला धमकी
3

अडीच लाख रुपये दे, अन्यथा बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवेन; तरुणीची व्यावसायिकाला धमकी

निकाहाला नकार, सनकी आशिकने १७ वर्षीय मुलीचा ओढणीने आवळला आवळून घेतला जीव; १२ तासांत अटक
4

निकाहाला नकार, सनकी आशिकने १७ वर्षीय मुलीचा ओढणीने आवळला आवळून घेतला जीव; १२ तासांत अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.