Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चाकण–तळेगाव महामार्गावर टेम्पो–रिक्षाची जोरदार धडक; मृत्यूंचा धक्कादायक आकडा समोर

चाकण–तळेगाव महामार्गावर म्हाळुंगे गावच्या हद्दीत सकाळी अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला टेम्पोची जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षा पूर्णपणे चक्काचूर झाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 18, 2025 | 04:53 PM
चाकण–तळेगाव महामार्गावर टेम्पो–रिक्षाची जोरदार धडक; मृत्यूंचा धक्कादायक आकडा समोर

चाकण–तळेगाव महामार्गावर टेम्पो–रिक्षाची जोरदार धडक; मृत्यूंचा धक्कादायक आकडा समोर

Follow Us
Close
Follow Us:
  • टेम्पो–रिक्षाची जोरदार धडक
  • मृत्यूंचा धक्कादायक आकडा समोर
  • म्हाळुंगे पोलिसांनी दिली माहिती
चाकण/अतिश मेटे : चाकण–तळेगाव महामार्गावर म्हाळुंगे गावच्या हद्दीत अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला टेम्पोची जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षा पूर्णपणे चक्काचूर झाली असून, दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती म्हाळुंगे पोलिसांनी दिली.

प्राथमिक माहितीनुसार, चाकण बाजूकडून औद्योगिक वसाहतीकडे प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचे पुढील चाक तुटल्याने रिक्षा असंतुलित झाली. त्याचवेळी समोरून येणाऱ्या टेम्पोची जोरदार धडक बसल्याने अपघाताची तीव्रता वाढली. कल्याणी हॉटेलजवळ, सिग्मा कंपनीसमोर हा अपघात घडला. या अपघातात कामावर जात असलेल्या दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

रामसुंदर राम खिलावन शाखेद (वय 47, सध्या रा. म्हाळुंगे, ता. खेड, जि. पुणे; मूळ रा. ओडकी, जिल्हा रिवा, मध्य प्रदेश), पिंटू राजन बिहारा (वय 25, सध्या रा. म्हाळुंगे; मूळ रा. पट्टा सुंदरपूर, पुरी, ओडिशा) अशी मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत तर रोहिदास सीताराम आडे (वय 36, रिक्षाचालक, रा. खराबवाडी), सागर मोहन मॉन्टी (वय 26, रा. खराबवाडी) हे जखमी झाले आहेत.

दरम्यान, चाकण परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध प्रवासी वाहतूक सुरू असतानाही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. रिक्षांना केवळ तीन प्रवाशांची परवानगी असताना दाटीवाटीने दहा–पंधरा प्रवासी कोंबून वाहतूक केली जात असल्याचे चित्र नेहमीच दिसून येते. अशा बेजबाबदार वाहतुकीमुळेच अपघातांना आमंत्रण मिळत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. अपघातप्रकरणी पुढील तपास म्हाळुंगे पोलीस करीत असून, अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात कडक कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

Web Title: An accident has occurred between a tempo and a rickshaw on the chakan talegaon highway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 02:51 PM

Topics:  

  • Accident Case
  • Accident Death
  • Chakan News

संबंधित बातम्या

Accident News: लोखंडी गर्डर चालकाच्या मांडीत घुसला अन्…; संगमेश्वरमध्ये कारचा भीषण अपघात
1

Accident News: लोखंडी गर्डर चालकाच्या मांडीत घुसला अन्…; संगमेश्वरमध्ये कारचा भीषण अपघात

Wai News : ओझर्डे येथे कार ओढ्यात कोसळून अपघात; चालक जखमी
2

Wai News : ओझर्डे येथे कार ओढ्यात कोसळून अपघात; चालक जखमी

अपघात प्रकरणातील पीडित कुटुंबाला लोकअदालतचा दिलासा; तब्बल एक कोटीची नुकसानभरपाई
3

अपघात प्रकरणातील पीडित कुटुंबाला लोकअदालतचा दिलासा; तब्बल एक कोटीची नुकसानभरपाई

नोटीसकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्लॉटधारक, डेव्हलपरांना दणका; चाकणमध्ये तिसऱ्या दिवशीही अनधिकृत प्लॉटिंगवर कारवाई
4

नोटीसकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्लॉटधारक, डेव्हलपरांना दणका; चाकणमध्ये तिसऱ्या दिवशीही अनधिकृत प्लॉटिंगवर कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.