Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे हादरलं! दांडक्याने बेदम मारहाण करुन तरुणाचा खून, कारण काय तर…

पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. हातउसने दिलेल्या पैशांवरून वाद झाल्यानंतर केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 12, 2025 | 01:10 PM
पुणे हादरलं! दांडक्याने बेदम मारहाण करुन तरुणाचा खून, कारण काय तर…

पुणे हादरलं! दांडक्याने बेदम मारहाण करुन तरुणाचा खून, कारण काय तर…

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. हातउसने दिलेल्या पैशांवरून वाद झाल्यानंतर केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला आहे. नवी पेठेतील राजेंद्रनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) वसाहतीत ही घटना घडली आहे. तरुणाच्या खून प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

आनंद परमेश्वर डोलारे (वय ३०, रा. एसआरए वसाहत, राजेंद्रनगर, नवी पेठ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मन्या सोनावणे (रा. राजेंद्रनगर) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत आनंद डोलारेची आई वनिता (वय ५७) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आनंद याला दारुचे व्यसन आहे. ५ जानेवारी रोजी तो कामावरुन रात्री घरी आला. दारु पिऊन तो वसाहतीच्या परिसरात थांबला होता. आरोपी मन्याने आनंदला हातउसने पैसे दिले होते. त्याने आरोपीला पैसे दिले नव्हते. त्यामुळे तो त्याच्यावर चिडला होता. घटनेच्या दिवशी रात्री आनंद वसाहतीत थांबला होता. त्यावेळी मन्या तेथे आला. हातउसने दिलेल्या पैशांवरुन दोघांमध्ये वाद झाला.

आनंदला दांडक्याने मारहाण केली. आरोपीने आनंदला उचलटून जमिनीवर आपटल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमी झालेल्या आनंदला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. खून केल्याप्रकरणी आरोपी मन्याला अटक करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप खाडे अधिक तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : कृषी आयु्क्तालयातील उपसंचालक एसीबीच्या जाळ्यात; अडीच लाख रुपयांची लाच घेताना पकडले

राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले

राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये जुन्या भांडणाच्या कारणातून 26 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. ही घटना सोमवारी (दि.2) सायंकाळी हसूल परिसरातील कारागृहाच्या बाजूच्या मैदानावर घडली. दिनेश उर्फ बबलू परमानंद मोरे (वय 26, रा. चेतनानगर, हसूल) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी अनिकेत गायकवाड व गणेश सोनवणे यांची नावे समोर आली असून, शोधासाठी चार पथके रवाना झाली. या हत्येप्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दगडाने ठेचून मुलाचा खून

दरम्यान गेल्या काही दिवसाखाली नगर रस्त्यावरील वाघोली भागात वाघेश्वरनगर येथे एका अल्पवयीन मुलाचा लोखंडी रॉड तसेच दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीला बोलत असल्याच्या रागातून हा खून झाल्याचे सांगण्यात आले आहे. प्रेमप्रकरणातून खून झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. गणेश वाघू तांडे (१७) असे हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मण पेटकर (वय ६०), नितीन पेटकर (वय ३१) आणि सुधीर पेटकर (वय ३२) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास घडली आहे.

Web Title: An incident has come to light in pune where a young man was brutally beaten to death with a stick nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2025 | 01:10 PM

Topics:  

  • crime news
  • maharashtra
  • Pune Crime

संबंधित बातम्या

पुण्यात 17 व्या मजल्यावरून उडी मारून मुलीची आत्महत्या; धक्कादायक कारणही आलं समोर
1

पुण्यात 17 व्या मजल्यावरून उडी मारून मुलीची आत्महत्या; धक्कादायक कारणही आलं समोर

CM Devendra Fadnavis : भोंदू खरातची आता ED चौकशी होणार ! देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2

CM Devendra Fadnavis : भोंदू खरातची आता ED चौकशी होणार ! देवेंद्र फडणवीसांची घोषणा

Crime News : नांदेड शहरावर गुन्हेगारीचे सावट झाले गडद; गँगवॉरमुळे शहराची शांतता आली धोक्यात
3

Crime News : नांदेड शहरावर गुन्हेगारीचे सावट झाले गडद; गँगवॉरमुळे शहराची शांतता आली धोक्यात

Palghar News : पहिले अत्याचार अन् मग पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न! पालघर जवळच्या ढाब्यावर नेमकं घडलं तरी काय?
4

Palghar News : पहिले अत्याचार अन् मग पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न! पालघर जवळच्या ढाब्यावर नेमकं घडलं तरी काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.