Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chiplun Crime : चिपळूनमध्ये सासूच्या बंद घरावर सुनेनेच मारला डल्ला; लाखो रुपयांचे दागिने लंपास

कौटुंबिक नातेसंबंधांना तडा देणारी धक्कादायक घटना चिपळूण शहरात उघडकीस आली असून, सासूच्या बंद घरातून सुनेनेच तब्बल दोन लाख रुपयांहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 20, 2026 | 06:26 PM
चिपळूनमध्ये सासूच्या बंद घरावर सुनेनेच मारला डल्ला; लाखो रुपयांचे दागिने लंपास

चिपळूनमध्ये सासूच्या बंद घरावर सुनेनेच मारला डल्ला; लाखो रुपयांचे दागिने लंपास

Follow Us
Follow Us:

चिपळूण : राज्यासह देशभरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, दररोज चोरटे नागरिकांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत. अशातच आता कौटुंबिक नातेसंबंधांना तडा देणारी धक्कादायक घटना चिपळूण शहरात उघडकीस आली असून, सासूच्या बंद घरातून सुनेनेच तब्बल दोन लाख रुपयांहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चिपळूण पोलिसांनी सुनेविरुद्ध घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

 

पाग कासकरआळी परिसरातील शाबीरा मंझील येथे राहणाऱ्या नईमा रफिक झारे (वय ५९) यांनी याबाबत चिपळूण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांची सून सानिया फारुख झारे (वय १८) हिच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दिनांक ५ जून रोजी रात्री ८ वाजल्यापासून ते दिनांक १४ जून रोजी दुपारी १ वाजेपर्यंतच्या कालावधीत ही घटना घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा : प्रेयसीच्या पतीला फोन करून बोलावलं अन् कोयत्याने संपवलं; सोलापुरात प्रेमप्रकरणातून थरारक हत्याकांड

फिर्यादीनुसार, नईमा झारे या घरी नसताना संशयित सानिया झारे हिने त्यांच्या परवानगीशिवाय बंद घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूमचा दरवाजा उघडून कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून नेले. चोरीस गेलेल्या ऐवजात ९.१८० ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस, दोन सोन्याच्या अंगठ्या आणि नाकातील सोन्याची पुली असा एकूण २ लाख ८ हजार ९१७ रुपयांचा ऐवज असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटना उघडकीस आल्यानंतर नईमा झारे यांनी १६ जून रोजी चिपळूण पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक १७७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता तसेच संबंधित कायदेशीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौटुंबिक वादातून अथवा अन्य कोणत्या कारणामुळे हा प्रकार घडला का, याचा तपास चिपळूण पोलिस करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याची खळबळ; मृत व्यक्तीला जिवंत दाखवत जमीन रजिस्टर केल्याचा आरोप; सात जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा

Web Title: An incident has occurred in chiplun where a daughter in law stole her mother in laws jewelry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 06:26 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • House Theft

संबंधित बातम्या

सासवडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, कार आडवी लावून वकिलासह पत्नीला बेदम मारहाण; शहरात संताप
1

सासवडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, कार आडवी लावून वकिलासह पत्नीला बेदम मारहाण; शहरात संताप

गावठी कट्टे बाळगणाऱ्या सराईतांची धरपकड, पाच जणांना घेतले ताब्यात; चार पिस्तुले जप्त
2

गावठी कट्टे बाळगणाऱ्या सराईतांची धरपकड, पाच जणांना घेतले ताब्यात; चार पिस्तुले जप्त

शाहूनगर डोरेमॉन खून प्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी आरोपींना तेलंगणातून घेतले ताब्यात
3

शाहूनगर डोरेमॉन खून प्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी आरोपींना तेलंगणातून घेतले ताब्यात

आयटी इंजिनिअरने आधी पत्नीला संपवलं, नंतर स्वत:वरही वार केले अन्…; देहूगावातील घटनेनं खळबळ
4

आयटी इंजिनिअरने आधी पत्नीला संपवलं, नंतर स्वत:वरही वार केले अन्…; देहूगावातील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.