Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News : टोळक्याकडून तलवारीने अन् लोखंडी रॉडने तरुणावर हल्ला; कारण काय तर…

केवळ एकमेकांकडे पाहिल्याच्या कारणावरून एका तरुणावर टोळक्याने तलवारीने आणि लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. मध्यस्थी करणाऱ्या त्याच्या नातेवाईक तरुणावर देखील तलवारीने वार करून गंभीर जखमी केले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 16, 2026 | 06:09 PM
आईच्या प्रियकराने केला तीन वर्षांच्या बालकाचा खून; आधी महिलेसोबत वाद घातले अन् नंतर...

आईच्या प्रियकराने केला तीन वर्षांच्या बालकाचा खून; आधी महिलेसोबत वाद घातले अन् नंतर...

Follow Us
Follow Us:

पिंपरी : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती पसरत आहे. अशातच आता केवळ एकमेकांकडे पाहिल्याच्या कारणावरून एका तरुणावर टोळक्याने तलवारीने आणि लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. मध्यस्थी करणाऱ्या त्याच्या नातेवाईक तरुणावर देखील तलवारीने वार करून गंभीर जखमी केले आहे. ही घटना पिंपळे निलख येथील डीपी रोडवर शनिवारी (१३ जून) रोजी रात्री दहा वाजताच्‍या सुमारास घडली आहे.

 

कार्तिक संतोष बालवडकर, अनिष्ट शरद मुरकुटे अशी जखमी तरुणांची नावे आहेत. संतोष जनार्दन बालवडकर (वय ४७, पिंपळे निलख) यांनी सांगवी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ऋषिकेश पाटील (वय २५), अभिषेक भासके (वय १८), जय शिंदे (वय १८, सर्व रा. पिंपळे निलख) यांना अटक केली आहे. त्यांच्यासह दोन अल्‍पवयीन बालकांवर गुन्हा दाखल केला आहे.

हे सुद्धा वाचा : पोलिसांवर फायरिंग करून फरार झाल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; ‘या’ भागात सापळा रचून पकडले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींचा मुलगा कार्तिक याने आरोपींकडे पाहिल्याच्या कारणावरून अल्‍पवयीन बालकाने आणि ऋषिकेश पाटीलने वाद घातला. त्यानंतर जय शिंदे व अभिषेक भासके यांनी तलवारीने आणि रॉडने कार्तिकच्या डोक्यात व कानावर वार केले. भांडण सोडवणाऱ्या अनिश मुरकुटे यालाही उलट्या तलवारीने मारहाण करत गंभीर जखमी केले. आरोपींनी हवेत हत्यारे फिरवून आम्ही येथील भाई आहोत, असे म्हणत दहशत निर्माण केली. सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : लोणावळ्यातील बंगल्यात सुरु असलेल्या ‘हाय-प्रोफाइल’ पार्टीवर छापा; तब्बल 18 जणांवर गुन्हा दाखल

विश्रांतवाडीत टोळक्याचा राडा

विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार जणांच्या टोळक्याने मोठा राडा घालत दोन तरुणांवर वार केले अन् नंतर परिसरात हत्यारे हवेत फिरवून दहशत माजवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. मात्र, तिघे अद्यापही फरार आहेत. शोएब रशीद कुरेशी (वय २६, रा. पंचशीलनगर, येरवडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात ३२ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिघांविरोधात गन्हा नोंद केला आहे. हा प्रकार येथील पंचशीलनगर येथील दयावान समाज मंदिराजवळ मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडला आहे.

Web Title: An incident has occurred in pune district where a group attacked a young man

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 06:09 PM

Topics:  

  • crime news
  • maharashtra
  • Pune Police

संबंधित बातम्या

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी
1

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर
2

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर

ऐन गणेशोत्सवातही फुलांचे भाव कोमेजले; अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत
3

ऐन गणेशोत्सवातही फुलांचे भाव कोमेजले; अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड
4

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.