
तू माझ्यावर प्रेम कर, नाहीतर मी...; पुणे जिल्ह्यातील संतापजनक प्रकार
या घटनेप्रकरणी एका तरुणीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, समीर अकबर हाश्मी (वय २५, रा. कदमवाक वस्ती, लोणी काळभोर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार १९ वर्षीय तरुणी एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. आरोपी समीर हाश्मी हा तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. मात्र तरुणीने त्याच्या प्रेमप्रस्तावाला नकार दिल्यानंतर आरोपी चिडला आणि तिचा छळ करण्यास सुरुवात केली.
घटनेच्या दिवशी आरोपी थेट तरुणीच्या घरात शिरला. “तू माझ्यावर प्रेम केले नाहीस तर तुला शिक्षण घेऊ देणार नाही,” अशी धमकी देत त्याने तरुणीला दहशतीखाली ठेवण्याचा प्रयत्न केला. यावेळी तरुणीने त्याला घराबाहेर ढकलण्याचा प्रयत्न केल्याने आरोपी अधिकच संतप्त झाला. त्यानंतर त्याने तरुणीला मारहाण करत तिचा विनयभंग केला. या घटनेनंतर तरुणीने धाडस दाखवत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी समीर हाश्मी याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ नाळे करीत आहेत.
हे सुद्धा वाचा : प्रेमविवाहाचा भयंकर शेवट; चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची गळा दाबून हत्या
पुण्यातील खळबळजनक घटना
मित्राच्या घरी जेवण करण्यास गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. खडकवासला परिसरातील डोणजे गावात ही घटना घडली आहे. तरुणाचा मृतदेह नाल्यात टाकून पसार झालेल्या सहा आरोपींनी हवेली पोलिसांनी अटक केली आहे. विशाल चव्हाण (रा. कोल्हेवाडी, खडकवासला, सिंहगड रस्ता) असे खून झालेल्याचे नाव आहे. खडकवासला परिसरातील डोणजे गावातील नाल्यात चव्हाणचा मृतदेह पडल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला मृतदेहाची ओळख पोलिसांना पटली नव्हती. सोशल मिडयावर तरुणाचा फोटो पोलिसांनी व्हायरला केला. त्यावेळी चव्हाण याच्या कुटुंबीयांनी ओळख पटविली. नंतर पोलिसांनी तपास सुरू करुन ६ जणांना अटक केली, अशी माहिती हवेली पोलिस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक वैशाली पाटील यांनी दिली.