काय नेमकं प्रकरण?
सचिन सिंग आणि श्वेता हे दोघेही मूळचे फतेहपूर जिल्ह्यातील रहिवासी होते. कुटुंबाचा विरोध झुगारून त्यांनी प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर काही काळ सुरतमध्ये त्यांनी घालवला. त्यानंतर ते कानपूरला स्थायिक झाले होते. सचिन रिक्षा चालवण्याचे काम करत होता. दोघांचा संसार सुखाने सुरु होता. तेव्हा सचिन आणि श्वेतामध्ये खटके उडू लागले. त्याला श्वेतावर संशय येऊ लागला. आपल्या बायोकोचे बाहेर अफेयर आहे, असे त्याला वाटू लागले.
बिंग फोडण्यासाठी केला प्लॅन
पत्नी श्वेताच्या अकाऊंटमध्ये वारंवार पैसे देखील येत होते. त्याने याबद्दल श्वेताला विचारल्यास आजीने पाठवलेत असं ती सांगायची. ते कानपुरला जिथे राहायचे तिथे त्यांच्या घरासमोर इंजिनियरिंगचे विद्यार्थी राहत होते, त्यांच्यावर त्यांला संशय होता. आपल्या पत्नीचे बिंग फोडण्यासाठी त्याने एक प्लॅन केला. त्याने पत्नीला फोन करून मित्रांसोबत पार्टी करत आहे, आज रात्रभर घरी येणार नाही, असं सांगितले.
सचिन पत्नीला न सांगता मध्यरात्री घरी पोहोचला. तो घरी येताच त्याच्या डोळ्यापुढे जे दृश्य होते ते पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याची पत्नी समोर राहणाऱ्या दोन तरुणांसोबत आक्षेपार्ह अवस्थेत सापडली. त्याने मोठा गोंधळ घातला. गोंधळ आवाज ऐकून शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना फोन केला. पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेत सर्वांना स्थानकात नेले आणि समज देऊन सोडून दिले.
सचिन आणि श्वेता घरी परतल्यानंतर दोघांमधील वाद वाढला. पत्नी श्वेताने पतीलाच धमकावण्यास सुरुवात केली. “तु त्या मुलांना काही केलेस तर मी त्या तिघांसोबत राहीन” असं श्वेताने म्हंटल. याचा राग सचिनला आला आणि त्याने थेट तिचा गळा दाबून हत्या केली. हत्येनंतर तो घटनास्थळावरून पळून गेला. हत्येनंतर तो काही तास शहरात भटकत होता, मात्र त्याला काही वेळात पश्चात्ताप झाला.
स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन दिली कबुली
शनिवारी सकाळी त्याने महाराजपूर पोलीस ठाणे गाठले. त्याने “साहब, मी माझ्या पत्नीला संपवले आहे, तिचा मृतदेह घरातच आहे,”अशी कबुली त्याने दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदे ताब्यात घेतला आहे. याची सखोल तपासणी पोलीस करत आहे.
Karjat Crime : माथेरानमध्ये चाकू–सुऱ्याचा धाक दाखवून चोरी; व्यापारी दाम्पत्याला बांधून दागिने लंपास
Ans: उत्तर प्रदेशातील कानपूर, महाराजपूर पोलीस स्टेशन हद्दीत.
Ans: पत्नीच्या चारित्र्यावर संशय आणि कौटुंबिक वादातून.
Ans: पत्नीची हत्या करून नंतर स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली.






