Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मद्यधुंद महिलेचा धिंगाणा! महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या लगावली कानशिलात; पुण्यातील प्रकार

मद्यधुंद अवस्थेतील महिलेने महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या कानशिलात मारत त्यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. कोरेगाव पार्क परिसरात ही घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 19, 2026 | 06:15 PM
मद्यधुंद महिलेचा धिंगाणा! महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या लगावली कानशिलात; पुण्यातील प्रकार

मद्यधुंद महिलेचा धिंगाणा! महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या लगावली कानशिलात; पुण्यातील प्रकार

Follow Us
Follow Us:
  • मद्यधुंद महिलेने महिला पोलिसाला मारली चापट
  • लायटर मागण्यावरून वाद; शिवीगाळ केल्याचा आरोप
  • पोलिसांत गुन्हा दाखल; तपास सुरू
पुणे : मद्यधुंद अवस्थेतील महिलेने महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या कानशिलात मारत त्यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. कर्तव्य बजावत असताना मद्याच्या अवस्थेत असताना तिने महिला कर्मचाऱ्यांना लायटर मागितले. महिला कर्मचारी यांनी तु मला लायटर कशी काय मागणी करते, असे म्हटंल्याने हा प्रकार घडला आहे. कोरेगाव पार्क परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात शितल सुधाकर मोरे (वय ४८, रा. नोबल हॉस्पिटलजवळ, हडपसर) हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ययाती मोतीगीर बामणे (वय ३०) यांनी तक्रार दिली आहे.

 

ही घटना दि. १८ ऑक्टोबर रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास कोरेगाव पार्कमधील लेन क्रमांक ७ येथील अ‍ॅनिस हॉटेलजवळ घडली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, बामणे या कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. रात्री गस्तीवर असताना वाहतूक कोंडी झाल्याने त्यांनी सीआर मोबाइल वाहन बाजूला लावले होते. त्यावेळी आरोपी महिला तेथे आली. विनाकारण शिवीगाळ करुन लायटर मागितले. तक्रारदार यांनी मला तु कसे काय लायटर मागितले असा विचारणा केली असता आरोपी महिलेने पुन्हा शिवीगाळ करत त्यांच्या गालावर चापट मारली व गोंधळ घातला, असे तक्रारीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक मोरे पुढील तपास करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : कॉलेजला गेलेली दामिनी घरी परतलीच नाही! वर्दे गावात एकतर्फी प्रेमातून तरुणीचा निर्घृण खून

औंधमध्ये १८ वर्षीय तरुणावर लोखंडी हत्याराने हल्ला

औंधमधील डी. पी. रोडवर अठरा वर्षीय तरुणाच्या डोक्यात लोखंडी हत्याराने मारून त्याला जखमी करण्यात आल्याची घटना घडली आहे. एका आरोपीने हत्याराने हल्ला केला, तर दुसऱ्याने तरुणाला पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची पोलिसांत तक्रार दिली आहे. याप्रकरणी प्रज्वल ओम कांबळे (वय १९, रा. पीएमसी बिल्डिंग, नागरस रोड, औंध) आणि गुरुराज देविदास फंड (वय २२, रा. पीएमसी बिल्डिंग, मेडीपॉइंटसमोर, डी. पी. रोड, औंध) यांच्यावर चतुःशृंगी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सिद्धेश राजू गायकवाड (वय १८, रा. पीएमसी बिल्डिंग, डी. पी. रोड, औंध) यांनी तक्रार दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १५ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीनंतर एक वाजून पाच मिनिटांनी अमेय अपार्टमेंटजवळ ही घटना घडली आहे. गायकवाड यांना काही समजण्यापूर्वीच कांबळे याने त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस लोखंडी हत्याराने मारले. फंड याने त्यांना पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ केली. पोलिस उपनिरीक्षक दबडे तपास करीत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात.

  • Que: महिला पोलिसांशी गैरवर्तन कोणी केले?

    Ans: शीतल सुधाकर मोरे (वय ४८) यांनी.

  • Que: आरोपी महिलेवर काय कारवाई झाली?

    Ans: कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: An incident has occurred in pune where a woman assaulted a female police nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 06:14 PM

Topics:  

  • crime news
  • pune news
  • Pune Police

संबंधित बातम्या

स्पेनच्या युजेनिओ चॅकाराचा गोल्फमध्ये जलवा! DP World India Championship चे पटकावले विजेतेपद
1

स्पेनच्या युजेनिओ चॅकाराचा गोल्फमध्ये जलवा! DP World India Championship चे पटकावले विजेतेपद

कॉलेजला गेलेली दामिनी घरी परतलीच नाही! वर्दे गावात एकतर्फी प्रेमातून तरुणीचा निर्घृण खून
2

कॉलेजला गेलेली दामिनी घरी परतलीच नाही! वर्दे गावात एकतर्फी प्रेमातून तरुणीचा निर्घृण खून

जुन्या वादाचा भयंकर शेवट! निलंगा तालुक्यात २२ वर्षीय तरुणाची हत्या; परिसरात खळबळ
3

जुन्या वादाचा भयंकर शेवट! निलंगा तालुक्यात २२ वर्षीय तरुणाची हत्या; परिसरात खळबळ

जुन्या वादातून थेट गोळीबार! नाशिकच्या आडगावमध्ये भरदिवसा दोन राऊंड फायर; संशयित फरार
4

जुन्या वादातून थेट गोळीबार! नाशिकच्या आडगावमध्ये भरदिवसा दोन राऊंड फायर; संशयित फरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.