Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जुन्या वादाचा भयंकर शेवट! निलंगा तालुक्यात २२ वर्षीय तरुणाची हत्या; परिसरात खळबळ

पत्नीशी बोलत असल्याच्या संशयातून झालेल्या जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर २२ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना निलंगा तालुक्यातील काटेजवळगा येथे घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 19, 2026 | 01:51 PM
जुन्या वादाचा भयंकर शेवट! निलंगा तालुक्यात २२ वर्षीय तरुणाची हत्या; परिसरात खळबळ

जुन्या वादाचा भयंकर शेवट! निलंगा तालुक्यात २२ वर्षीय तरुणाची हत्या; परिसरात खळबळ

Follow Us
Follow Us:
  • पत्नीशी बोलत असल्याच्या संशयातून वाद
  • निलंगा तालुक्यात तरुणाची धारदार शस्त्राने हत्या.
  • महेबूब मुल्लाविरुद्ध तक्रार दाखल; पोलिसांकडून तपास सुरू
निलंगा : लातूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पत्नीशी बोलत असल्याच्या संशयातून झालेल्या जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर २२ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना निलंगा तालुक्यातील काटेजवळगा येथे घडली आहे. शनिवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली आहे. सोहेल गुलाब पठाण असे मृत तरुणाचे नाव असून, याप्रकरणी महेबूब गफार मुल्ला याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोहेल हा आई सायरा आणि वडील गुलाब पठाण यांच्यासोबत काटेजवळगा येथे राहत होता. त्यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने ते सध्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरी तात्पुरते वास्तव्यास होते. शनिवारी सोहेल शेतातील काम आटोपून घरी आला होता. रात्रीच्या सुमारास तो बांधकाम सुरू असलेल्या घराजवळ बसून मोबाईल पाहत होता.

दरम्यान, रात्री आठच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या एका महिलेने सोहेलच्या आईला बाहेर बोलावून त्याला मारहाण झाल्याची माहिती दिली. त्यानंतर आईने घटनास्थळी धाव घेतली असता सोहेल रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला. त्याच्या छातीच्या डाव्या बाजूला धारदार शस्त्राने वार केल्याच्या गंभीर जखमा होत्या.

हे सुद्धा वाचा : हल्लेखोर डरपोक, कुठेतरी लपून बसतात अन्…; टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

कुटुंबीयांनी सोहेलला तातडीने खासगी वाहनातून निलंगा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेने सोहेलच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, सोहेल आणि महेबूब मुल्ला यांच्यात सुमारे दोन महिन्यांपूर्वी महेबूबच्या पत्नीशी सोहेल बोलत असल्याच्या संशयावरून वाद झाला होता. त्यावेळी गावातील नागरिक आणि नातेवाइकांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला होता. तसेच, यापुढे संशयावरून भांडण करणार नसल्याचे सांगत महेबूबने माफी मागितली होती, असे सोहेलच्या आईने तक्रारीत नमूद केले आहे. या जुन्या वादातूनच हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून, याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या झालेल्या तरुणाचे नाव काय?

    Ans: सोहेल गुलाब पठाण (वय २२).

  • Que: हत्या कुठे आणि कधी झाली?

    Ans: निलंगा तालुक्यातील काटेजवळगा येथे शनिवारी रात्री आठच्या सुमारास.

  • Que: हत्येमागील कारण काय सांगितले जात आहे?

    Ans: पत्नीशी बोलत असल्याच्या संशयातून झालेला जुना वाद हे संभाव्य कारण असल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: An incident involving the murder of a young man has taken place in nilanga taluka nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 01:47 PM

Topics:  

  • crime news
  • Latur Crime
  • Murder Case

संबंधित बातम्या

जुन्या वादातून थेट गोळीबार! नाशिकच्या आडगावमध्ये भरदिवसा दोन राऊंड फायर; संशयित फरार
1

जुन्या वादातून थेट गोळीबार! नाशिकच्या आडगावमध्ये भरदिवसा दोन राऊंड फायर; संशयित फरार

औंधमध्ये १८ वर्षीय तरुणावर लोखंडी हत्याराने हल्ला, लाथाबुक्क्यांनीही मारहाण; नेमकं काय घडलं?
2

औंधमध्ये १८ वर्षीय तरुणावर लोखंडी हत्याराने हल्ला, लाथाबुक्क्यांनीही मारहाण; नेमकं काय घडलं?

दामिनी पालव हत्या प्रकरणाचा ५ तासांत छडा; एकतर्फी प्रेम, १८ वार अन् आरोपीच्या घरापर्यंत पोहोचले पोलीस!
3

दामिनी पालव हत्या प्रकरणाचा ५ तासांत छडा; एकतर्फी प्रेम, १८ वार अन् आरोपीच्या घरापर्यंत पोहोचले पोलीस!

Baramati News: उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला; बारामती एमआयडीसीतील विमानतळवर नेमक काय घडलं?
4

Baramati News: उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला; बारामती एमआयडीसीतील विमानतळवर नेमक काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.