Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime : पुण्यात सासरच्यांकडून दोन जावयांना मारहाण, एकाच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर; तर दुसऱ्याचे…

पत्नी आणि मुलाला भेटण्यासाठी सासरी गेलेल्या तरुणाला जुन्या वादातून सासरच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मेव्हण्याने हातातील लायटरने नाकावर वार केल्याने जावयाच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर होऊन तो गंभीर जखमी झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 13, 2026 | 04:46 PM
पुण्यात सासरच्यांकडून दोन जावयांना मारहाण, एकाच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर; तर दुसऱ्याचे...

पुण्यात सासरच्यांकडून दोन जावयांना मारहाण, एकाच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर; तर दुसऱ्याचे...

Follow Us
Follow Us:

पुणे : पत्नी आणि मुलाला भेटण्यासाठी सासरी गेलेल्या तरुणाला जुन्या वादातून सासरच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मेव्हण्याने हातातील लायटरने नाकावर वार केल्याने जावयाच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर होऊन तो गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी अकबर खान, अकबर युसूफ खान आणि मोईन अकबर खान (सर्व रा. संपन्न हाइट्स, मिठानगर, कोंढवा) यांच्यावर पुण्यातील कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रिझवान राजअहमद शेख (वय २६, रा. महविया हाइट्स, मिठानगर, कोंढवा) यांनी तक्रार दिली आहे. ही घटना ११ जुलै रोजी रात्री सव्वा ते साडेदहा वाजण्याच्या दरम्यान मिठानगर येथील संपन्न हाइट्स इमारतीच्या पार्किंगमध्ये घडली आहे.

 

पोलीसांच्या माहितीनुसार, तक्रारदार रिझवान हे पत्नी व मुलाला भेटण्यासाठी सासरी गेले होते. तेथे जुन्या वादाच्या कारणावरून सासरच्या नातेवाईकांनी त्यांना शिवीगाळ केली. रिझवान तेथून निघून आल्यानंतर आरोपी अकबर युसूफ खान याने फोनवरून शिवीगाळ सुरू केली. याबाबत जाब विचारण्यासाठी रिझवान पुन्हा तेथे गेले असता मेव्हणा मोईन अकबर खान याने हातातील फायटरने त्यांच्या नाकावर व डोक्यात मारहाण केली. या हल्ल्यात त्यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर होऊन ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणाचा पुढील तपास कोंढवा पोलिस करत आहेत.

हे सुद्धा वाचा : जेजुरी वारी मार्गावर काळाचा घाला, भरधाव ट्रकच्या धडकेत ३ महिला वारकऱ्यांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत जाहीर

अशीच आणखी एक घटना पुण्यात घडली आहे. पत्नीच्या माहेरी मोबाईल आणण्यासाठी गेलेल्या जावयाला पत्नी आणि सासरच्या नातेवाईकांनी लाथाबुक्क्यांनी तसेच कपडे धुण्याच्या बॅटने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी प्रभावती विक्रम मोहिते (वय ५३), माधुरी ऊर्फ सोनू गुंड, रेश्मा गणेश उभे आणि अश्विनी रामभाऊ निपाणीकर (सर्व रा. लोअर इंदिरानगर, बिबवेवाडी) यांच्याविरुद्ध बिबवेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रामभाऊ माणिक निपाणीकर (वय ३८, रा. लोअर इंदिरानगर, बिबवेवाडी) यांनी तक्रार दिली आहे. ही घटना १२ जुलै रोजी दुपारी अडीचच्या सुमारास लोअर इंदिरानगर येथे घडली आहे. पोलीसांच्या माहितीनुसार, रामभाऊ हे त्यांच्या पत्नीच्या माहेरी स्वतःचा मोबाईल घेण्यासाठी गेले होते. त्यांनी पत्नीला मोबाईल मागितला असता, सासरच्या नातेवाईकांनी संतापून त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करत कपडे धुण्याच्या बॅटने व लाकडी स्टॅम्पने मारून जखमी केले. या प्रकरणाचा पुढील तपास बिबवेवाडी पोलीस करत आहेत.

Web Title: An incident has occurred in pune where two sons in law were assaulted by their in laws

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 04:46 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Satara Crime: वाईत गावठी पिस्टलचा धसका; दोन आरोपी जेरबंद, दोन पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त
1

Satara Crime: वाईत गावठी पिस्टलचा धसका; दोन आरोपी जेरबंद, दोन पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त

Crime News: HR मीटिंगसाठी गेला अन् बेपत्ता; पाच दिवसांनी हत्येचा उलगडा, जाणुन घ्या नेमकं काय घडलं?
2

Crime News: HR मीटिंगसाठी गेला अन् बेपत्ता; पाच दिवसांनी हत्येचा उलगडा, जाणुन घ्या नेमकं काय घडलं?

सासवडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, गावठी पिस्टलसह तरुण ताब्यात; तब्बल 7 लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त
3

सासवडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, गावठी पिस्टलसह तरुण ताब्यात; तब्बल 7 लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगरमध्ये २ भयानक घटना! महिलेसह तरुणीवर अत्याचार; वॉशरुमचा दरवाजा ढकलला अन्…
4

अहिल्यानगरमध्ये २ भयानक घटना! महिलेसह तरुणीवर अत्याचार; वॉशरुमचा दरवाजा ढकलला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.