
पहाटे तरुणांची गाडी अडवली, चाकूचा धाक दाखवून हात-पाय बांधलेअन्...; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ
न्यायालयाने दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर कुख्यात आरोपी अझीम पुटकसह त्यांच्या अन्य फरार साथीदारांचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गणेश ताठे यांनी दिली. या प्रकरणात अक्षय माधवराव मुळे (वय २१, रा. बाळापूर फाटा, बीड बायपास) याने फिर्याद दिली आहे.
अक्षय हा अनिरुद्ध अनंतराव काळे आणि रवींद्र लिंबाजी मगरे या मित्रांसोबत कर्णपुरा येथे देवीदर्शनासाठी गेला होता. २१ ऑक्टोबर रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास तिघे मित्राला संजयनगरात सोडण्यासाठी जात असताना एचपी गॅस गोदामासमोरील गल्ली क्रमांक ९ च्या कोपऱ्यावर अझीम पुटक, शेख हुसेन, आमेर आणि त्यांच्या साथीदारांनी त्यांची गाडी अडवली. तिघांना बाजूच्या पत्र्याच्या शेडमध्ये ओढून नेले. तेथे हातपाय बांधून चाकूचा धाक दाखवत मारहाण केली. आरडाओरड केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली.
सकाळी सातपर्यंत डांबून ठेवले
आरोपींनी अक्षयच्या गळ्यातील १०० ग्रॅम वजनाची चांदीची साखळी, तीन ग्रॅमच्या सोन्याच्या कानातील बाळ्या आणि मोबाईल, तसेच अनिरुद्ध व रवींद्र यांचे मोबाईल हिसकावले. एकूण ५८ हजारांचा ऐवज लुटल्यानंतर तिघांना सकाळी सात वाजेपर्यंत शेडमध्ये डांबून ठेवले. त्यानंतर आरोपींनी त्यांना सोडून दिले.
Ans: संजयनगरातील एचपी गॅस गोदामासमोरील गल्ली क्रमांक ९ येथे तीन तरुणांना अडवून पत्र्याच्या शेडमध्ये डांबण्यात आले. चाकूचा धाक दाखवून मारहाण करत त्यांच्याकडील दागिने आणि मोबाइल लुटण्यात आले.
Ans: आरोपींनी सोन्याच्या कानातील बाळ्या, चांदीची साखळी आणि तीन मोबाइल असा एकूण ५८ हजार रुपयांचा ऐवज लुटला.
Ans: जिन्सी पोलिसांनी शेख हुसेन शेख गौस आणि आमेर सय्यद बाबर या दोघांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, अझीम पुटक आणि त्याच्या फरार साथीदारांचा शोध सुरू आहे.