Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मध्य प्रदेशातून गावठी पिस्तूल आणून संभाजीनगरमध्ये विक्री, सहा जणांच्या टोळीचा पर्दाफाश; तब्बल…

मध्य प्रदेशातून गावठी पिस्तूल आणून शहरात ३८ ते ५० हजार रुपयांना विक्री करायची आणि अटक टाळण्यासाठी पिस्तूल व काडतुसे वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवायची, अशी कार्यपद्धती असलेल्या टोळीचा सिडको पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 25, 2026 | 11:41 AM
मध्य प्रदेशातून गावठी पिस्तूल आणून संभाजीनगरमध्ये विक्री, सहा जणांच्या टोळीचा पर्दाफाश; तब्बल...

मध्य प्रदेशातून गावठी पिस्तूल आणून संभाजीनगरमध्ये विक्री, सहा जणांच्या टोळीचा पर्दाफाश; तब्बल...

Follow Us
Follow Us:
  • गावठी पिस्तूल विक्री करणाऱ्या सहा जणांना अटक
  • चार पिस्तूल आणि ११ जिवंत काडतुसे जप्त
  • मध्य प्रदेशातून पिस्तूल आणून विक्री
छत्रपती संभाजीनगर : मध्य प्रदेशातून गावठी पिस्तूल आणून शहरात ३८ ते ५० हजार रुपयांना विक्री करायची आणि अटक टाळण्यासाठी पिस्तूल व काडतुसे वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवायची, अशी कार्यपद्धती असलेल्या टोळीचा सिडको पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी एकाच रात्री छापे टाकून सहा जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चार पिस्तूल आणि ११ जिवंत काडतुसे असा दोन लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. टोळीने यापूर्वी किती पिस्तूल विकली, याचा तपास सुरू आहे.

 

शिवा अंबादास सुरे (वय २५, सुरेवाडी), सुमीत सुनील विसपुते (सुरेवाडी), सत्यम भास्कर चाटे (वय २३, मयूरपार्क), अर्जुन किशोर लिंगायत (नवजीवन कॉलनी), श्रीकांत सतीश शिखरे (वय २४, मयूरपार्क) आणि विशाल राजू भोसले (वय २४, एसटी कॉलनी) अशी आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ही माहिती पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी दिली.

सुरेवाडीत एक तरुण पिस्तूल व दोन काडतुसे बाळगून फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल येरमे आणि उपनिरीक्षक अनिल नाणेकर यांच्या पथकाने सापळा रचून शिवा सुरेला पकडले. त्याने पिस्तूल मित्र सुमीत विसपुते याच्या घरी ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी तेथून पिस्तूल व दोन काडतुसे जप्त केली. चौकशीत हे पिस्तूल सत्यम चाटे आणि अर्जुन लिंगायत यांच्याकडून विकत घेतल्याचे समोर आले. सत्यमकडून आणखी एक पिस्तूल जप्त करण्यात आले. अर्जुनने जाधववाडीतील मोंढा परिसरात झाडाखाली लपविलेली दोन पिस्तूलही पोलिसांनी हस्तगत केली. ही कारवाई सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक अतुल येरमे यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण पथकाचे उपनिरीक्षक अनिल नाणेकर, हवालदार मंगेश पवार, सहदेव साबळे, अमोल अंभोरे, नरेश भोंडे, अतुल सोळुंके यांनी केली.

काडतुसे लपविण्यासाठी साथीदार

सत्यम आणि अर्जुनच्या चौकशीत श्रीकांत शिखरे व विशाल भोसले यांच्याकडे काडतुसे ठेवल्याचे समोर आले. या दोघांकडून आणखी नऊ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. अशा प्रकारे चार पिस्तूल आणि ११ काडतुसे पोलिसांच्या हाती लागली.

उच्चशिक्षित आरोपी; तिघांवर गुन्हे

शिवा सुरे, अर्जुन लिंगायत आणि श्रीकांत शिखरे यांनी बीसीएस, सुमीत विसपुतेने बीएससी इन्फॉर्मेटिक्स, तर सत्यम चाटेने बीकॉमचे शिक्षण घेतले आहे. शिवा कंत्राटदार असून अन्य आरोपी खासगी नोकरी करतात. श्रीकांतविरुद्ध सिडको, जिन्सी आणि मुंबईतील विक्रोळी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. शिवा आणि विशाल यांच्याविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे.

हे सुद्धा वाचा : टायगर श्रॉफ हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट समोर; इंदूरमधून आणखी एकाला पोलिसांनी केली अटक

पथकाला लाखांचे बक्षीस

सत्यम आणि अर्जुन मध्य प्रदेशातून पिस्तूल आणून शहरात विक्री करीत होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी शिवा सुरेला एक पिस्तूल व दोन काडतुसे विकली होती. शस्त्रे आणि काडतुसे लपवून ठेवणाऱ्यांना पैसे दिले जात होते. शहरात यापूर्वी किती पिस्तूल विकली, याचा शोध घेण्याचे आदेश उपायुक्त नवले यांनी दिले. कारवाई करणाऱ्या पथकाला एक लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले.

हे सुद्धा वाचा : स्विफ्ट कारमध्ये गावठी पिस्तूल अन् तीन जिवंत काडतुसे; बारामती पोलिसांनी तरुणाला ठोकल्या बेड्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: गावठी पिस्तूल विक्री प्रकरणात किती जणांना अटक झाली?

    Ans: छत्रपती संभाजीनगरमधील गावठी पिस्तूल विक्री प्रकरणात सिडको पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले असून, न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

  • Que: आरोपींकडून पोलिसांनी किती शस्त्रे आणि काडतुसे जप्त केली?

    Ans: पोलिसांनी आरोपींकडून चार गावठी पिस्तूल आणि ११ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या मुद्देमालाची एकूण किंमत दोन लाख २२ हजार रुपये आहे.

  • Que: आरोपी गावठी पिस्तूल कुठून आणत होते?

    Ans: आरोपी मध्य प्रदेशातून गावठी पिस्तूल आणून छत्रपती संभाजीनगर शहरात त्यांची ३८ ते ५० हजार रुपयांना विक्री करत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्यांनी यापूर्वी किती पिस्तूल विकली, याचा तपास सुरू आहे.

Web Title: The police have arrested six individuals who were selling country made pistols nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • Arrested News
  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news

संबंधित बातम्या

Kalyan News: खाकी वर्दीचा गैरवापर? मज्जाव केल्याचा राग धरत पोलिसांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा गंभीर आरोप!
1

Kalyan News: खाकी वर्दीचा गैरवापर? मज्जाव केल्याचा राग धरत पोलिसांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा गंभीर आरोप!

टायगर श्रॉफ हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट समोर; इंदूरमधून आणखी एकाला पोलिसांनी केली अटक
2

टायगर श्रॉफ हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट समोर; इंदूरमधून आणखी एकाला पोलिसांनी केली अटक

स्विफ्ट कारमध्ये गावठी पिस्तूल अन् तीन जिवंत काडतुसे; बारामती पोलिसांनी तरुणाला ठोकल्या बेड्या
3

स्विफ्ट कारमध्ये गावठी पिस्तूल अन् तीन जिवंत काडतुसे; बारामती पोलिसांनी तरुणाला ठोकल्या बेड्या

Student Dies By Self Immolation: दिल्लीत शाळेतच विद्यार्थीनीची पेटवून घेऊन आत्महत्या; ३ पानांच्या सुसाईड नोटमध्ये नेमकं काय?
4

Student Dies By Self Immolation: दिल्लीत शाळेतच विद्यार्थीनीची पेटवून घेऊन आत्महत्या; ३ पानांच्या सुसाईड नोटमध्ये नेमकं काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.