पेट्रोलचे पैसे मागताच कामगाराला पंपातच मारहाण; पेट्रोल पंप उडवून देण्याचीही दिली धमकी
मंचर : राज्यात लुटमारीच्या घटना वाढल्या असून, पेठ (ता. आंबेगाव) येथे बुधवार, दिनांक २३ जुलै रोजी दुपारी भरदिवसा बँकेतून पैसे काढून घरी जात असलेल्या ज्येष्ठ नागरिकाला दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी लुटल्याची घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांचे कृत्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भावडी (ता. आंबेगाव) येथील माजी सरपंच महेश नवले यांचे वडील शिवाजी भामा नवले (वय ८०) हे पेठ गावचा आठवडे बाजार असल्याने काही व्यवहारासाठी पीडीसी बँकेच्या पेठ शाखेत आले होते. त्यांनी बँकेतून १२ हजार रुपये रोख रक्कम काढून ती रक्कम कापडी पिशवीत ठेवली होती.
पैसे काढल्यानंतर दुपारी सुमारे १.३० च्या सुमारास ते घरी जाण्यासाठी निघाले असता, पेठ गावाच्या मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर अचानक दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या हातातील पिशवी हिसकावून पळ काढला. नवले हे वयोवृद्ध असल्यामुळे पाठलाग करू शकले नाहीत. त्यांनी आरडाओरडा केला मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. या घटनेनंतर मंचर पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली असून, पुढील तपास सुरू आहे. चोरीचे संपूर्ण चित्रण परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाले आहे.
हे सुद्धा वाचा : दारूच्या बिलावरून वाद; ग्राहकाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली
पेठमध्ये चोरीच्या घटना वाढल्या
“भर दुपारी ज्येष्ठ व्यक्तीला लुटण्याचा प्रकार गंभीर असून, परिसरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट झाला आहे. पोलिसांनी तत्काळ बंदोबस्त करावा.” अशी मागणी पेठ ग्रामपंचायतचे सरपंच संजय पवळे यांनी केली आहे.
वॉशरूमच्या खिडकीतून प्रवेश करुन चोरी
दुसऱ्या मजल्यावरील वॉशरूमच्या खिडकीतून सराफी दुकानात शिरलेल्या चोरट्यांनी पावणे पाच लाखांचा ऐवज चोरून पोबारा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी रोकड आणि दागिने चोरून नेले आहेत. बाजीराव रोडवरील बुधवार पेठेतील आर. जे. ज्वेलर्स या दुकानात ही घटना घडली आहे. याप्रकरणी रितेश पिचा (वय ४४, रा. मार्केटयार्ड) यांनी विश्रामबाग पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रितेश यांचे आर. जे. ज्वेलर्स नावाचे सराफी दुकान आहे. दरम्यान, दुकान दुमजली आहे. खाली सोने विक्रीचे दुकान तर वरती दागिने बनविण्याची जागा व वॉशरूम आहे. दरम्यान नेहमीप्रमाणे ते दुकान बंद करून गेले होते. तेव्हा अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री दुसऱ्या मजल्यावरील वॉशरूमच्या खिडकीतून आत प्रवेश केला. तसेच, दुकानातील सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण ४ लाख ७४ हजार रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला. अधिक तपास पोलिस करत आहेत.