Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेताच्या बांधाच्या वादातून शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला, दगड अन् लाकडी काठीने बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?

पिंपळवंडी येथील लेंडे बामणे मळा परिसरात शेताच्या बांधाच्या किरकोळ वादातून एका ६० वर्षीय शेतकऱ्यावर लाकडी काठी व दगडाने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 01, 2026 | 12:30 AM
शेताच्या बांधाच्या वादातून शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला, दगड अन् लाकडी काठीने बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?

शेताच्या बांधाच्या वादातून शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला, दगड अन् लाकडी काठीने बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:

आळेफाटा : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, दररोज खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यासारख्या घटना घडत आहेत. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. पिंपळवंडी येथील लेंडे बामणे मळा परिसरात शेताच्या बांधाच्या किरकोळ वादातून एका ६० वर्षीय शेतकऱ्यावर लाकडी काठी व दगडाने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश सिताराम शिंदे हे त्यांच्या शेतात ट्रॅक्टरने नांगरणी करत असताना शेजारील नवनाथ जगन्नाथ शेळके व संजय जगन्नाथ शेळके यांनी शेताचा बांध नांगरल्याच्या कारणावरून त्यांच्याशी वाद घातला. हा वाद काही क्षणांतच हाणामारीत बदलला.

फिर्यादीनुसार, नवनाथ शेळके यांनी लाकडी काठीने रमेश शिंदे यांना पायावर व पाठीवर मारहाण केली. ते खाली पडल्यानंतर त्यांच्यावर दगडाने डोक्यात वार करण्यात आला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. जखमी रमेश शिंदे यांना प्रथम घरी आणण्यात आले. मात्र रात्री त्यांना चक्कर येणे, उलट्या होणे आणि प्रकृती बिघडल्याने आळेफाटा येथील युनिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

हे सुद्धा वाचा : पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनाला वेग, आत्तापर्यंत 1150 कोटींचे वाटप; आणखी निधी…

तपासणीदरम्यान त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याचे डॉक्टरांनी निदर्शनास आणून दिले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून ते जबाब देण्याच्या स्थितीत नसल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी रमेश शिंदे यांच्या पत्नी लता रमेश शिंदे यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, नवनाथ जगन्नाथ शेळके आणि संजय जगन्नाथ शेळके या दोघांविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत.

हे सुद्धा वाचा : केतन अग्रवाल हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आता पोलीस ‘AI’ अन् Gate Analysis च्या मदतीने उघड करणार गुपिते!

Web Title: An incident has occurred where a farmer was assaulted following a minor dispute over a farm boundary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Farmers

संबंधित बातम्या

Neelam Gorhe यांच्या निवासस्थानी घुसखोरीचा प्रयत्न; पिशवीत हातोडा, पक्कड अन्…
1

Neelam Gorhe यांच्या निवासस्थानी घुसखोरीचा प्रयत्न; पिशवीत हातोडा, पक्कड अन्…

Neral Cime: बाईक चोरी करणाऱ्या टोळीला दणका! मुख्य आरोपी अटकेत, दोन अल्पवयीन ताब्यात
2

Neral Cime: बाईक चोरी करणाऱ्या टोळीला दणका! मुख्य आरोपी अटकेत, दोन अल्पवयीन ताब्यात

Accident News: येवला तालुक्यात दुर्दैवी घटना; आई-वडिलांच्या नजरचुकीने गरम पाणी अंगावर सांडले, चिमुकली…
3

Accident News: येवला तालुक्यात दुर्दैवी घटना; आई-वडिलांच्या नजरचुकीने गरम पाणी अंगावर सांडले, चिमुकली…

LPU Violence: लव्हली प्रोफेशनल विद्यापीठात राडा; पोलिसांच्या वाहनांना आग, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज
4

LPU Violence: लव्हली प्रोफेशनल विद्यापीठात राडा; पोलिसांच्या वाहनांना आग, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.