Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जुन्या भांडणाच्या कारणावरून टोळक्याचा तरुणावर हल्ला; कोयत्याने डोक्यावर अन् हातावर सपासप वार

जुन्या भांडणाच्या कारणावरून एका टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 23, 2026 | 12:30 AM
जुन्या भांडणाच्या कारणावरून टोळक्याचा तरुणावर हल्ला; कोयत्याने डोक्यावर अन् हातावर सपासप वार

जुन्या भांडणाच्या कारणावरून टोळक्याचा तरुणावर हल्ला; कोयत्याने डोक्यावर अन् हातावर सपासप वार

Follow Us
Follow Us:

पिंपरी : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. खून, खुनाचा प्रयत्न, गोळीबार यासारख्या घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अशातच आता जुन्या भांडणाच्या कारणावरून एका टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (२१ जून) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास, चिखली येथील भाजी मंडई रोड व साने चौक येथे घडली आहे.

 

याबाबत विनायक उर्फ बाबू राजू ननावरे (वय२४, सुदर्शन नगर, साने चौक, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सिद्धार्थ धाईजे (२१, अंठाजनगर, निगडी), शिवशंकर श्रीमंगल (२०, मेंदळवाडी, चाकण) आणि त्यांच्या इतर दोन अनोळखी मित्रांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सिद्धार्थ आणि शिवशंकर या दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि त्यांच्या दोन अनोळखी मित्रांनी फिर्यादीला जुन्या भांडणाच्या रागातून जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने डोक्यावर व हातावर वार करून गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादीचा मित्र ऋतीक कसाळकर याला कानाखाली मारली. आरोपींनी तिथून निघून जाताना कोयते हवेत उगारून लोकांना “समोर याल तर एकेकाला बघून घेईल” अशी धमकी देऊन परिसरात दहशत माजवली. चिखली पोलीस अधिक तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : पतीने पत्नीला गुंगीचे औषध पाजून मित्राजवळ सोडले, नंतर हॉटेलमध्ये…; छत्रपती संभाजीनगरमधील संतापजनक प्रकार

पुण्यात भाड्याच्या वादातून रिक्षाचालकावर हल्ला

भाड्यावरुन वाद झाल्याने प्रवाशाने रिक्षाचालकाच्या डोक्यात दगड घातल्याची घटना हडपसर भागात घडली आहे. या प्रकरणी प्रवाशाविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ईश्वर बरोडा पवार (वय ३७, रा. वैदुवाडी, हडपसर) असे जखमी झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. या प्रकरणी प्रवासी भागवत गुंडाप्पा वाले (वय २५, रा. केशव चौक, माळवाडी, हडपसर) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पवार यांनी याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी हा रखवालदार म्हणून काम करतो. १८ जून रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हडपसर गाडीतळ परिसरात रिक्षाचालक पवार हे थांबले होते. त्यावेळी आरोपीने वैदुवाडीला जाण्यासाठ किती भाडे घेणार आहे, अशी विचारणा केली. भाड्यावरुन त्यांच्यात वाद झाला. आरोपीने रिक्षाचालक पवार यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. त्यांच्या डोक्यात दगड घातला. या घटनेत पवार जखमी झाले. पोलीस हवालदार मुंढे अधिक तपास करत आहेत.

Web Title: An incident has occurred where a group attacked a young man over a past dispute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news

संबंधित बातम्या

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
1

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
2

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
3

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर
4

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.