Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंस्टाग्रामवर ओळख, तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं; नंतर लॉजवर घेऊन गेला अन्…

सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामच्या माध्यमातून झालेल्या ओळखीचे प्रेमसंबंधात रूपांतर झाले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून एका २२ वर्षीय तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 03, 2026 | 01:55 PM
इंस्टाग्रामवर ओळख, तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं; नंतर लॉजवर घेऊन गेला अन्...

इंस्टाग्रामवर ओळख, तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं; नंतर लॉजवर घेऊन गेला अन्...

Follow Us
Follow Us:

वैजापूर : सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामच्या माध्यमातून झालेल्या ओळखीचे प्रेमसंबंधात रूपांतर झाले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून एका २२ वर्षीय तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून एकाविरुद्ध वीरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटना शिर्डी परिसरात घडल्याने पुढील तपासासाठी हा गुन्हा शिर्डी पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. आकाश दगू कसबे (रा. डोणगाव ता. वैजापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पोलिसांत दाखल झालेल्या तक्रारीनुसार, शिर्डी येथील २२ वर्षीय तरुणीची सुमारे वर्षभरापूर्वी इन्स्टाग्रामवरून आकाश कसबे याच्याशी ओळख झाली होती. ओळखीनंतर दोघांमध्ये मोबाईलवर नियमित संवाद सुरू झाला. कालांतराने मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. त्याने आपण एकाच समाजातील असल्याचे सांगून लग्न करण्याचे आश्वासन दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फेब्रुवारी २०२६ पासून तो तरुणीला लॉजवर भेटण्याचा आग्रह करत होता. सुरुवातीला तिने नकार दिला. मात्र, लग्नाचे वारंवार आश्वासन दिल्यानंतर एप्रिल २०२६ मध्ये ती भेटण्यास तयार झाली. त्यानंतर त्याने शिर्डी येथील एका लॉजमध्ये नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर १५ एप्रिल व ३ मे २०२६ रोजीही त्याच लॉजमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

मे महिन्यात मासिक पाळी न आल्याने गर्भधारणा चाचणी करण्यात आली. त्यात ती गर्भवती असल्याचे समोर आले. याबाबत आकाशला माहिती दिल्यानंतर त्याने लवकरच लग्न करू, अशी हमी दिली. त्यानंतर तो तरुणीला डोणगाव येथील आपल्या घरी घेऊन गेला. ती तेथे दोन दिवस राहिली. मात्र, नंतर घरच्यांचा विरोध असल्याचे कारण देत त्याने लग्न पुढे ढकलण्यास सुरुवात केली. काही दिवसांनी त्याने लग्नास स्पष्ट नकार देत तरुणीचा मोबाईल क्रमांकही ब्लॉक केल्याचा आरोप आहे.

हे सुद्धा वाचा : बापट चौकात 25 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या; अवघ्या दोन तासांत दोन संशयित ताब्यात

प्रकरण शिर्डी पोलिसांकडे वर्ग

दरम्यान, सलग तीन महिने मासिक पाळी न आल्याने तरुणीच्या आईने २४ जुलै २०२६ रोजी तिला एका खासगी रुग्णालयात नेले. तेथे करण्यात आलेल्या सोनोग्राफीमध्ये ती सुमारे तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तरुणीने आईसमवेत वीरगाव पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून प्राथमिक कार्यवाही केली असून, घटना शिर्डी परिसरात घडल्यामुळे पुढील तपासासाठी प्रकरण शिर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Web Title: An incident has occurred where a young woman was deceived under the pretext of marriage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 01:55 PM

Topics:  

  • Arrested News
  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news

संबंधित बातम्या

फ्लॅट विक्रीतील 2.64 कोटींच्या अपहाराचा आरोप; बांधकाम व्यावसायिक दाम्पत्यावर गुन्हा दाखल
1

फ्लॅट विक्रीतील 2.64 कोटींच्या अपहाराचा आरोप; बांधकाम व्यावसायिक दाम्पत्यावर गुन्हा दाखल

Sillod Murder Case : सिल्लोडमधील खुनाचा अखेर उलगडा; पोलिसांनी पत्नीसह तिघांना ठोकल्या बेड्या
2

Sillod Murder Case : सिल्लोडमधील खुनाचा अखेर उलगडा; पोलिसांनी पत्नीसह तिघांना ठोकल्या बेड्या

फुरसुंगी भागात मजुरावर तीक्ष्ण शस्त्राने वार, दोघांना अटक; नेमकं काय घडलं?
3

फुरसुंगी भागात मजुरावर तीक्ष्ण शस्त्राने वार, दोघांना अटक; नेमकं काय घडलं?

तुझी इन्स्टा आयडी दे, मला तुझ्यासोबत…; अल्पवयीन तरुणीला भर रस्त्यात मारहाण
4

तुझी इन्स्टा आयडी दे, मला तुझ्यासोबत…; अल्पवयीन तरुणीला भर रस्त्यात मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.