काय घडलं नेमकं?
रविवारी उशिरा रात्री एका युवकाची हत्या करण्यात आली. मृत युवकाची ओळख शरीफ बेग रशीद बेग (वय २५, रा. लालखडी) अशी आहे. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारधार शास्त्राने सपासप वार केले. ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तेव्हा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
Sillod Murder Case : सिल्लोडमधील खुनाचा अखेर उलगडा; पोलिसांनी पत्नीसह तिघांना ठोकल्या बेड्या
या घटनेची माहिती मिळताच शहर कोतवाली पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीच्या शोधला लागले. पोलिसांनी अवघ्या दोन तासात मोठी कारवाई करत दोन संशयित आरोपींना जेरबंद केले आहे. इरफान खान जावेद खान याला डीबी पथकाने ताब्यात घेतले. तर गुन्हे शाखेच्या पथकाने शेख रेहान शेख हारून याला ताब्यात घेतले आहे.
सध्या पोलिसांनी दोन्ही संशयितांची कसून चौकशी सुरू आहे. या हत्येमागचा नेमका कारण काय हे तपासात आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या तपासामध्ये आणखी महत्वाचे धागेदोरे समोर येणायची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
कबूतर चोरीच्या वादातून दोन जणांची हत्या; अमरावतीत सरपंचासह सात जणांना बेड्या
अमरावती येथून एक दुहेरी हत्याकांडाची घटना समोर आली आहे. २ जिवलग मित्रांची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सरपंचासह ७ आरोपींना अटक केली आहे. यात सरपंचासह ५ मुख्य आरोपी सामील आहेत. घडलेली घटना अमरावती येथील वलगाव येथे घडली. या दुहेरी घटनेने अमरावती हादरली असून एकच खळबळ उडाली आहे.
वलगाव येथे मध्यरात्री २ तरुणांची हत्या करण्यात आली होती. ऋतिक पंडित (वय २५ वर्षे) आणि संजोग जोशी (वय २४ वर्षे) अशी हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. कबूतर चोरल्याच्या वादातून ही हत्या करण्यात आली. मध्यरात्रीच्या सुमारास ऋतिक पंडित आणि संजोग जोशी हे दोघे वलगाव बसस्टँड परिसरात असताना आरोपींनी त्यांच्यावर अचानक जीवघेणा हल्ला केला. धारदार शस्त्राने वार करत त्यांना जागीच संपवण्यात आले होते. हा हल्ला इतका भयानक होता की संजोग आणि ऋतिक या गंभीर जखमी झालेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने खळबळ उडाली आहे.
फ्लॅट विक्रीतील 2.64 कोटींच्या अपहाराचा आरोप; बांधकाम व्यावसायिक दाम्पत्यावर गुन्हा दाखल
Ans: शरीफ बेग रशीद बेग (वय 25).
Ans: दोन संशयितांना.
Ans: सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे.






