Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक, दोघांना अटक; 14 जणांवर गुन्हा दाखल

ॲमनोरा व फुरसुंगी परिसरात सुरू असलेल्या एका कथित हायटेक सायबर फसवणूक रॅकेटचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 13, 2026 | 02:08 PM
पुण्यात ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक, दोघांना अटक; 14 जणांवर गुन्हा दाखल

पुण्यात ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक, दोघांना अटक; 14 जणांवर गुन्हा दाखल

Follow Us
Follow Us:

पुणे : ॲमनोरा व फुरसुंगी परिसरात सुरू असलेल्या एका कथित हायटेक सायबर फसवणूक रॅकेटचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे. येथून मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक उपकरणे, बनावट कागदपत्रे, बँक खात्यांची माहिती आणि एक पिस्तूलसह जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

 

संतोष दत्ता वेंजणेकर (वय ४७, रा. पार्क इन्फिनिया सोसायटी, भेकराईनगर, मुळ रा. वेजणे, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) आणि विनायक ऊर्फ दीपक मनोहर इक्के (वय ४०, रा. सिल्व्हर वुड सोसायटी, फुरसुंगी) अशी अटक केलेल्यांची नाव आहेत. त्यांचा प्रमुख साथीदार अमित मजेटिया हा दुबई येथे असून, भागिरथ पांड्या हा त्यांचे सर्व आर्थिक व्यवहार सांभाळत असल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ॲमनोरा चेंबर्स, ॲमनोरा मॉल आणि फुरसुंगी येथील कार्यालयांमधून ॲपेक्स ॲचिव्हर आणि जे.के. इंडिया सोल्यूशन प्रा.लि. या नावाने कॉल सेंटर चालविले जात होते. येथे नागरिकांना विविध वेबसाईटद्वारे ऑनलाइन गेमिंगमध्ये गुंतवून पैसे जमा करण्यास भाग पाडले जात होते. विश्वास संपादन करून आर्थिक व्यवहार घडवून आणल्यानंतर फसवणूक केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी सांगितले की, १० जून रोजी दुपारपासून सुरू झालेल्या या कारवाईत पुणे शहर पोलिसांच्या विविध शाखांतील सुमारे २०० अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. सायबर तज्ज्ञ, फॉरेन्सिक टीम व तांत्रिक पथकांच्या मदतीने एकाच वेळी अनेक ठिकाणी छापे टाकले.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी हार्ड डिस्क, एसएसडी, सर्व्हर व ऑटो डायलर मशीन शेकडो सिम कार्ड, सीम बॉक्स सेटअप, लॅपटॉप, मोबाईल, डीव्हीआर, सीसीटीव्ही डेटा ग्राहकांना फसवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कॉल स्क्रिप्ट अनेक बँक खात्यांची कागदपत्रे, रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने ताब्यात घेतले. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी संतोष वेंजणेकर याच्यावर कॉल सेंटरमधील कर्मचाऱ्यांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन त्यात फेरफार करून सिम कार्ड मिळवणे आणि बनावट बँक खाती उघडण्याचा गंभीर आरोप आहे. या खात्यांचा वापर आर्थिक व्यवहार आणि पैशांची वळवळ करण्यासाठी करण्यात येत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा : भरधाव ट्रक थेट लॉजमध्ये घुसला, एकाचा मृत्यू तर एक जखमी; धुळे-सोलापूर हायवेवर भीषण अपघात

अल्पवयीन मुलांचे शोषण?

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे कॉल सेंटरमध्ये ५ अल्पवयीन मुला-मुलींना कामावर ठेवले होते, असा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. त्यांच्याकडून बेकायदेशीर स्वरूपाचे काम करून घेतल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: An incident has occurred where citizens were financially defrauded under the guise of online gaming

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 02:08 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार
1

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार

दणदणाट करणाऱ्या डीजेला पुणे पोलिसांचा दणका; तब्बल 14 लाखांचा ट्रक-साउंड सिस्टीम जप्त
2

दणदणाट करणाऱ्या डीजेला पुणे पोलिसांचा दणका; तब्बल 14 लाखांचा ट्रक-साउंड सिस्टीम जप्त

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न
3

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न

महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल
4

महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.